नवी मुंबई – हार्बर मार्गावरील नवी मुंबईत सर्वात गजबजलेले रेल्वेस्थानक म्हणजे सीवूड्स दारावे रेल्वेस्थानक या सीवूड्स व नेरुळ रेल्वेस्थानकाच्या दरम्यान जुने सीवूड्स दारावे रेल्वे फाटक होते.ते रेल्वेफाटक अनेक वर्षापूर्वी बंद करण्यात आले परंतू याच ठिकाणी दारावे गाव तसेच पूर्व विभागातील नागरीकांना पश्चिम भागात जाण्यासाठी बनवण्यात येणारा पादचारी पुल तयार आहे.परंतू दुसरीकडे नेरुळ पूर्व पश्चिम जोडणारा आयुक्त बंगल्यासमोरुन होणारा प्रस्तावित उड्डाणपुल मागील १२ वर्षापासून कागदावरच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई शहरातून जाणाऱ्या रेल्वेमार्गावर अनेक पादचारी पुल बांधण्यात आले आहेत.त्यामुळे नागरीकांना पूर्व पश्चिम जाण्यासाठी सुविधा झाल्या आहेत. गजबजलेल्या व सध्या रेल्वेस्थानकाच्या परिसरात एल अन्ड टी कंपनीचे मोठे गृहनिर्माण प्रकल्प साकारले जात असताना या सीवूड्स स्थानकाजवळील रेल्वे पादचारी पुलही पूर्ण करण्यात आला आहे.परंतू एकीककडे रेल्वेमार्गावर पादचारी पूल करण्यात येत असताना दुसरीकडे तेरणा कॉलेज सेक्टर २८ ते ते नेरुळ पूर्वेकडील नवी मुंबई महापालिका आयुक्त निवास असलेल्या सेक्टर  २१ या दोन भागांना जोडणार उड्डाणपुल मात्र अनेक वर्षापासून कागदावरच आहे. मागील वर्षी अभियांता विभागामार्फत प्रस्तावित असलेल्या अनेक कामामध्ये या उड्डाणपुलाचे कामही प्रस्तावित होता.परंतू हा उड्डाणपुल वर्षानुवर्ष कागदावरच आहे.

हेही वाचा >>> ‘नवी मुंबई : वाशी बाजारात नाताळाची लगभग; भारतीय बनावटी साहित्य मोठ्या प्रमाणावर उपलब्ध

नेरुळ रेल्वेस्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या सेक्टर २८ तसेच विविध विभागांसाठी पूर्व दिशेला येण्यासाठी असलेला राजीव गांधी उड्डाणपुल तसेच एल ॲन्ड टी उड्डाणपुल यांच्यामधील अंतर अधिक असल्याने नागरीकांना मोठा वेळसा खालुन जावे लागते.त्यासाठी पालिकेने प्रस्तावित केलेला उड्डाणपुल अजूनही प्रतिक्षेतच आहे.याबाबत स्थानिक नागरीक व नेरुळ पश्चिमेकडील नागरीकांची उड्डाणपुलाची मागणी असताना अद्याप उड्डाणुल कागदावर असून पुन्हा नव्याने सादर होणाऱ्या फेब्रुवारी महिन्यातील अर्थसंकल्पात पुन्हा प्रस्तावित म्हणून घेऊन किती वर्ष प्रतिक्षा करावी लागणार असल्याचा प्रश्न नागरीकांना पडला आहे.त्यामुळे रेल्वे तसेच नवी मुंबई महापालिकेच्या प्रयत्नातून या विभागात  उड्डाणपुल करण्याची मागणी करण्यात येत आहे.

मागील १० वर्षापासून  उड्डापुलाची मागणी पण प्रस्ताव जैसे थे….

नेरुळ  सेक्टर २८ येथुन नेरुळ पूर्वेला सेक्टर २१ येथे उड्डापुलाची मागणी  केली असून मागील १० वर्षापासून उड्डाणपुल रस्त्यावरच आहे.याबाबत पालिकेने तात्काळ निर्णय घेऊन उड्डाणपूलाची निर्मिती करावी हीच नागरीकांची मागणी आहे

स्वप्ना गावडे,माजी नगरसेविका

चौकट- नेरुळ पूर्व पश्चिम जोडणारा उड्डाणपुल प्रस्तावित आहे.मागील अर्थसंकल्पातील महत्वाच्या कामात या उड्डाणपुलाचा उल्लेख आहे.परंतू रेल्वेच्या परवानगीसाठी पाठपुरावा सुरु असून  रेल्वेकडून परवानगी मिळताच  उड्डाणपुलाच्या कामाबाबत कार्यवाही करण्यात येईल.

संजय देसाई,शहर अभियंता

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Flyover connecting to nerul east west waiting for permission since last 12 years zws
First published on: 20-12-2022 at 19:58 IST