नवी मुंबई : नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे घातक असल्याचे विधान राज्याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी केले आहे. हे भूखंड देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील मान्य नव्हते. मात्र तरीही या भूखंडांचे वाटप केले गेले. एकनाथ शिंदे यांनी भूखंड देण्याबाबतची प्रकिया रद्द करा असे आदेश दिले होते. या आदेशाबाबत भविष्यकाळात कारवाई होईल असा मला विश्वास आहे, असे नाईक म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्या कालखंडामध्ये त्यांची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या आणि हे मी त्यांनाही बोललो होतो. त्यावेळी त्यांची हतबलता नव्हती. परंतु काही गोष्टी त्या कालखंडामध्ये सहन कराव्या लागतात. नजरेला चांगले दिसत नसतानाही त्याकडे दुर्लक्ष करावे लागते, असे विधान वनमंत्री गणेश नाईक यांनी बुधवारी नवी मुंबईतील कार्यक्रमात बोलताना केले होते. नवी मुंबई पोलीस आयुक्लयाच्या वतीने शहरात ‘नशामुक्ती अभियान’ राबविण्यात येत असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अभियानाचा शुभारंभ बुधवारी झाला. यावेळी नाईक यांनी हे वक्त्यव्य केले होते. असे असतानाचा आता गणेश नाईक यांनी नवी मुंबईतील एमआयडीसी भूखंड वाटपाबाबत मोठे विधान करताना गेल्या पाच वर्षांत ठाणे-बेलापूर अैाद्योगिक पट्ट्यात झालेल्या भूखंडवाटपाविषयी देखील पुन्हा हरकत नोंदवली आहे.

Will the post of CIDCO Board Chairman be changed soon
सिडको मंडळाच्या अध्यक्षपदाचा लवकरच खांदेपालट?
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
navi mumbai firing
नवी मुंबई : सानपाडा गोळीबार प्रकरणी एक अटक
possibility of Eknath Shinde and Ganesh Naik coming together in municipal elections is less
महायुतीच्या संकेतांना नवी मुंबईत खोडा? महापालिका निवडणुकीत शिंदे- नाईक मनोमिलनाची शक्यता धुसरच
What Amruta Fadnavis Said?
Amruta Fadnavis : उद्धव ठाकरेंबाबतच्या प्रश्नावर अमृता फडणवीस यांचं उत्तर, “राजकारणात आज शत्रू असणारा उद्या मित्र..”
Eknath shinde shivsena
नवी मुंबईत शिंदे शिवसेनेचे बंड कायम; ऐरोलीत विजय चौगुले, तर बेलापूरमध्ये विजय नहाटा रिंगणात
Navi Mumbai corporation new policy car Parking problem
नवी मुंबईत पार्किग कोंडीवर अखेर उतारा, महापालिकेच्या नव्या धोरणात मुबलक पार्किंगचे नियोजन
Navi Mumbai Accident
VIDEO : विरुद्ध दिशेने वाहन चालवणं नवी मुंबईतील दोन तरुणींच्या जीवावर बेतलं; कारच्या धडकेत मृत्यू

हे ही वाचा… नवी मुंबईत पार्किग कोंडीवर अखेर उतारा, महापालिकेच्या नव्या धोरणात मुबलक पार्किंगचे नियोजन

हे ही वाचा… घरांचे दर ठरविताना अध्यक्षांना विश्वासात घेतले नव्हते का? सिडकोच्या सोडत प्रक्रियेतील संतप्त अर्जदारांचा सवाल

वाद काय ?

गणेश नाईक आमदार असताना त्यांनी ठाणे – बेलापूर रस्त्याजवळच्या आणि नवी मुंबई एमआयडीसी क्षेत्रातील सेवा रस्ता लगतचे भूखंड विकण्यासाठी ठाणे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथील दलालांची टोळी सक्रिय झाली असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. या भूखंडाचा उपयोग हा विविध विकासकामे उभारण्यासाठी अपेक्षित असल्याचे त्यांनी सातत्याने सांगितले होते. याच भूखंडाचा वाद आहे. नवी मुंबई एमआयडीसीतील सेवा रस्ता लगतचे भूखंड देणे अत्यंत घातक आहे. हे भूखंड देण्याबाबत तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील सकारात्मक नव्हते. तरीही हे भूखंड दिले गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी भूखंड देण्याबाबतची प्रकिया रद्द करण्याचे आदेश दिले होते. या आदेशाबाबत भविष्यकाळात कारवाई होईल असा मला विश्वास असल्याचेही गणेश नाईक यांनी स्पष्ट केले आहे.

Story img Loader