पनवेल  फेसबूकच्या माध्यमातून अनेकजण आपसात जोडले गेले आहेत. मात्र याच फेसबूकवरील चुकीच्या संदेशांमुळे अनेकांवर फौजदारी कारवाई होण्याची वेळ येते. अशीच घटना कामोठे पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे. नोकरी करणाऱ्या २३ वर्षीय पिडीत तरुणीला एक तरुण मागील दोन वर्षांपासून फेसबूकवरुन हाय बायचे संदेश पाठवित होता.

हेही वाचा >>> नवी मुंबईतील परवाने मुंबईतील फेरीवाल्यांना; अधिकाऱ्यांच्या मनमानीचा आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोन दिवसांपूर्वी (ता.६) या तरुणाने पिडीतेच्या फेसबूकवर ‘तीन हजार’ रुपयांची अक्षरी संख्या लिहून त्यापुढे ‘तूला यामध्ये रस आहे का’ अशी विचारणा लघुसंदेशातून केली. एवढ्यावर हा तरुण थांबला नाही. त्याने पुढील संदेशामध्ये पिडीतेला ‘मी अजूनही पैसे द्यायला तयार आहे’ असे लिहून पाठविले. पिडीतेने तातडीने कायद्याचा वापर करुन विनयभंग झाल्याप्रकरणी कामोठे पोलीसांत धाव घेतली. पोलीसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने सूत्रे हलविली. संबंधित तरुणाचा फेसबूकवरुन पोलीसांनी शोध घेतला. या तरुणाची माहिती मिळाल्यावर हा तरुण २५ वर्षांचा असून तो खांदेश्वर वसाहतीमधील सेक्टर १२ येथील गंगोत्री या इमारतीमध्ये राहत असल्याचे पोलीसांना समजले. या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक मोनाली चौधरी या करीत असून संशयीत तरुणावर भादवी. कलम ३५४ (ड) सह माहिती तंत्रज्ञान अधिनियम २०००, कलम ६७ नूसार कायदेशीर गुन्हा नोंदविला आहे. पिडीतेचा विनयभंग करणे या तरुणाला चांगलेच महागात पडले आहे.