Panvel Robbery Case पनवेल – नवीन पनवेल वसाहतीमधील सेक्टर १७ येथील एका दूकानात शिरून चोरट्याने दूकानदाराची सोनसाखळी हिसकावून पसार झाला. ही घटना मंगळवारी सकाळी अकरा वाजण्याच्या सूमारास पीएल ५ इमारत क्रमांक १२ येथे घडली. दूकानदार हे जेष्ठ नागरिक होते. कालपर्यंत रस्त्यावरून पायी चालणा-यांना लुटणा-यांची दहशत शहरात वाढत चालली असून सामान्य नागरिक या घटनेमुळे धास्तावले आहेत.
खांदेश्वर पोलीस ठाण्यात या घटनेबाबत रितसर अनोळखी चोरट्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सेक्टर १७ येथील महेश स्पोर्टस या दूकानात क्रीडा साहीत्य विक्रीस उपलब्ध आहे. या दूकानात ६० वर्षीय जेष्ठ नागरिक हे मंगळवारी असताना ग्राहक असल्याचे भासवून २० ते २२ वर्षांचा तरूण मुलगा तेथे क्रीकेटचे साहीत्य करण्यासाठी आला. त्याने बॅट व इतर साहीत्य दाखविण्यासाठी दूकानदारांना सांगीतले. बॅट खालून वर उचलून दाखविण्यासाठी दूकानदार वाकल्यावर काही क्षणात अनोळखी चोरट्याने दूकानदाराच्या गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. तसेच दूकानात मोबाईल फोन सुद्धा घेऊन चोरटा तेथून पसार झाला.
ही घटना त्या दूकानामधील सीसीटिव्ही कॅमेरामध्ये कैद झाली. या घटनेनंतर पिडीत दूकानदाराने खांदेश्वर पोलीस ठाण्यात येऊन या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तातडीने याबाबत अनोळखी चोरट्याविरोधात ८० हजार रुपयांची सोनसाखळी आणि ३० हजार रुपये किमतीचा मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदवली. या प्रकरणामुळे दूकानदार सुद्धा नवी मुंबईत असूरक्षित असल्याची चर्चा व्यापा-यांमध्ये सुरू आहे. या घटनेची गंभीर दखल खांदेश्वर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता ढाकणे यांनी घेतली असून याबाबत चोरटा पकडण्यासाठी तपास कार्य सुरू केल्याची माहिती पोलीस अधिकारी ढाकणे यांनी दिली.