नवी मुंबई : वाशी ते सानपाडा दरम्यान रुळला तडा गेल्याने हा ट्रॅक लोकल वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल मार्गावरील लोकल ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत आहेत.

आज रात्री सव्वा आठच्या सुमारास हार्बर मार्गावरील  वाशी ते सानपाडा रेल्वे रुळाला तडा गेल्याचे निदर्शनास आल्याने या ट्रॅक वरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. त्यामुळे एक लोकल अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ खोळंबली होती. सानपाडा आणि वाशी ही दोन्ही स्टेशन जवळजवळ असल्याने अनेकांनी लोकल मधून उतरून स्टेशन वर दाखल झाले होते. अशी माहिती एका प्रवाशाने दिली. रात्री उशिरापर्यंत ट्रेन १५ ते २० मिनिटे उशिराने धावत होती. ट्रॅक दुरुस्तीचे काम सुरू असून नेमका किती वेळ लागेल हे सांगता येत नाही अशी माहिती एका कर्मचाऱ्याने दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

याबाबत मध्य रेल्वे जनसंपर्क अधिकारी यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला मात्र संपर्क न झाल्याने प्रतिक्रिया मिळू शकली नाही.