नवी मुंबई : नवी मुंबई शहरात आज दिवसभर पावसाच्या जोर धारा कोसळल्या. शहरात मागील काही दिवस चांगला पाऊस पडत असून दिवसभर कोसळणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले होते. शहरात सायन पनवेल महामार्गासह शिळ फाटा, ठाणे बेलापूर मार्गावर वाहतूक कोंडी झाली होती. दिवसभर संपूर्ण नवी मुंबईत जोरदार पाऊस झाला असून सर्वाधिक पाऊस ऐरोली व दिघा विभागात झाला आहे.शहरातील जोरदार पावसामुळे महापालिकेचा इंडियन स्वच्छता लीग हा कार्यक्रमही लांबणीवर पडला आहे. तर दुसरीकडे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणाची पाणीपातळीही सलग  पडणाऱ्या पावसामुळे वाढत असल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा <<< आता प्रक्रियायुक्त सांडपाण्याची होणार विक्री; पहा कोणती पालिका करणार सुरुवात…

हेही वाचा <<< अतिवृष्टीमुळे ‘इंडियन स्वच्छता लीग’ पुढे ढकलली; या तारखेला पालिकेचे आयोजन…

नवी मुंबई शहरात सकाळपासूनच पावसाचा जोर होता. रस्त्यावर सखल भागात पाणी साचण्याच्या घटना घडला रस्ते मार्गावरील वाहतूक मंदावली होती. तर जोरदार पावसामुळे रेल्वेस्थानकाकडे व कार्यालया गाठणाऱ्यांच्या चांगलचे हाल झाले, शहरातील अनेक ठिकाणी कमी वेळात अधिक पाऊस झाल्याने पाणी साचण्याच्या घटना घडल्या.  बेलापूर  तसेच नेरुळमधील एमआयडीसी  तसेच ऐरोली, दिघा परिसरात पाणी साठण्याच्या घटना समोर आल्या असून  दिघ्यात सर्वांधिक ७७.४० मिली तर ऐरोली विभागात ७०.१० मिमी असा सर्वाधिक पाऊस झाला आहे.

हेही वाचा <<< नवी मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची कार्यकारणी बरखास्त नवनियुक्त अध्यक्षांचा निर्णय

ठाणे बेलापूर, तसेच सायन पनवेल महामार्गावर रस्ते वाहतूक मंदगतीने सुरु असल्याचे चित्र होते. संपूर्ण नवी मुंबईतील बेलापूर ,नेरुळ, वाशी विभागात ऐरोली दिघ्याच्या तुलनेत कमी पाऊस होता. परंतू  कमी वेळात जोरदार पाऊस पडल्याने रस्त्यावरही पावसाचे पाणी साचलेले पाहायला मिळाले. सकाळपासूनच   पावसाची संततधार सुरु झाली असल्याने पालिकेचा  इंडियन स्वच्छता लीग कार्यक्रम होणाऱ्या  गणपत शेठ तांडेल मैदान राजीव गांधी मैदान येथेही जोरदार पावसामुळे पाणी साचले होते.हवेत गारवा निर्माण झाला होता.  शहरात दिवसभर जोरदार पाऊस झाला असून  शहरात नेरुळ व वाशी याठिकाणी  झाडे पडल्याची  माहिती पालिका आप्तकालिन विभागाने दिली.

हेही वाचा <<< मासिक वेतनासाठी माळी कामगारांचे भीक मांगो आंदोलन

शहरात सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० पर्यंतचा पाऊस

  बेलापूर- ४६.५०

नेरुळ- ४१.००

वाशी- ४५.००

कोपरखैरणे- ७६.००

ऐरोली- ७०.१०

दिघा- ७७.८०

सरासरी पाऊस- ५९.४०मिमी

झाडे पडली- २

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Heavy rains throughout day navi mumbai cloudy skies impact road traffic ysh
First published on: 16-09-2022 at 20:07 IST