नवी मुंबई : दिव्यांग व्यक्तींना मुख्य प्रवाहात आणून त्यांच्या सक्षमीकरणासाठी नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने विविध योजना, उपक्रम राबविले जात आहेत. दिव्यांगांच्या सक्षमीकरणाकरिता त्यांना स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्टॉल देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. दिव्यांगांकरिता शहरातील विविध ठिकाणी ३३० स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. मागील दोन महिन्यांपासून रेंगाळलेल्या दिव्यांग स्टॉल वाटपाला अखेर सुरुवात झाली असून बेलापूरमध्ये १४ जणांना स्टॉल देण्यात आले आहेत.यांनातर याऐरोली येथे देण्यात येणार असून टप्प्याटप्प्याने विभागानुसार वाटप करण्यात येणार आहे.

मागील वर्षभरापासून दिव्यांगाना स्टॉल उपलब्ध करून देण्याचे नियोजन आखण्यात आले होते. याकरिता दिव्यांगांकडून अर्ज मागविण्यात आलेले होते . या दिव्यांगांच्या स्टॉलकरिता सिडकोकडे जागेची मागणी करण्यात आली होती, त्यानुसार १७ ते १८ भूखंड देण्यात आले आहेत, अशी माहिती मालमत्ता विभागाने दिली आहे. स्टॉलची निर्मिती करतानाही दिव्यांगांच्या दृष्टीने सुविधा उपलब्ध असून स्टॉलमध्ये दिव्यांगांना ये-जा करण्यासाठी रॅम्पची व्यवस्था आहे.

हेही वाचा : मोबाईल अ‍ॅप्लिकेशनचा वापर स्वतः शिका, दुसऱ्यावर विश्वास ठेवू नका; अन्यथा आर्थिक फटका…

मात्र मागील कित्येक महिन्यांपासून पात्रतांची यादी पूर्ण असूनही दिव्यांगांच्या स्टॉलसाठी जागा निश्चित न केल्याने तयार स्टॉल वाशी, घणसोली, ऐरोली विभागात मोकळ्या भूखंडावर पडून होते. मात्र अखेर दिव्यांगांच्या स्टॉलसाठी जागा निश्चित करण्यात येत असून टप्प्याटप्प्याने विभागानुसार दिव्यांगांना स्टॉल वाटप करण्यात येत आहे. बेलापूरपासून सुरुवात करण्यात आली असून त्यांनंतर ऐरोलीत स्टाॅलवाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती मालमत्ता विभागाचे उपायुक्त दिलीप नेरकर यांनी दिली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : बाजारात डाळी, तांदूळ, ज्वारीचे दर कडाडले; एपीएमसीत ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत ९%-१५% दरवाढ

विभाग दिव्यांग स्टॉल संख्या
बेलापूर १४
नेरुळ ५४
वाशी ५७
तुर्भे १६
कोपरखैरणे २४
घणसोली ५७
ऐरोली ९०
दिघा १८