नवी मुंबई : नवी मुंबईतील नेरुळ येथील एका बस थांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या एका तरुणीवर अनोळखी व्यक्तीने जीवघेणा हल्ला केला. तिच्या डोक्यावर बाटलीचा वार केल्यानंतर फुटलेली बाटली तिच्या पोटात भोसकण्याचा प्रयत्न केला. यात तरुणी जबर जखमी झाली होती. तिच्यावर सध्या उपचार सुरु असून हत्येचा प्रयत्न केल्याच्या गुन्ह्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे. हुसेन इमाम हसन शमशु असे अटक आरोपीचे नाव आहे. यातील जखमी युवतीचे नाव निशा कुंभार असे आहे. निशा हि ऐरोलीत राहणारी असून तिच्या महाविद्यालय सेमिस्टर परीक्षा क्रमांक नेरुळ येथील एका महाविद्यालयात आला आहे. त्यामुळे चार तारखेला ती नेरुळ येथे आली व महाविद्यालयातील काम करत परत घरी जाण्यासाठी जवळच्या बस थांब्यावर ख़ुशी कदम या आपल्या मैत्रिणी समवेत थांबली.

हेही वाचा : नवी मुंबईच्या पाणी वादाला शिंदे-नाईकांच्या संघर्षाची किनार ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दोघीही परीक्षा संदर्भात बोलत असताना अचानक हातात काचेची बाटली घेऊन एक व्यक्ती आला आणि त्याने बाटलीने निशाला मारहाण सुरु केली. निशाणे प्रतिकार करताना ती बाटली फुटली. मात्र त्याच अवस्थेत फुटलेली बातमी निशाच्या पोटात खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र हा वार निशाणे वाचवला. मात्र कमरेला मोठी दुखापत झाली. दरम्याने दोन जण धावत आले त्यामुळे आरोपी पळून गेला. नेरुळ पोलिसही घटनास्थळी आले. त्यांनी तात्काळ निशाला नजीकच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. आरोपीचा शोध घेत आरोपीला अटक करण्यात आली आहे. अशी माहिती नेरुळ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी भगत यांनी दिली. आरोपी याच परिसरात भीक मागणारा आहे. विक्षिप्त आणि मनोरुग्ण असल्याप्रमाणे वागतो. अशी माहिती काही प्रत्यक्षदर्शींनी दिली.