नवी मुंबई : नवी मुंबईतील पावणे कोपर खैरणे एमआयडीसी मधील नवभारत इंडस्ट्रियल केमिकल कंपनीला भीषण आग लागली आहे. सकाळी अकराच्या सुमारास ही आग लागली असून आगीचे कारण स्पष्ट नाही.

आगीची माहिती मिळताच एमआयडीसी , नवी मुंबई मनपा अग्निशमन दलाच्या सात गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सदर कंपनीत रासायनिक पदार्थ वापर असल्याने आग पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा…व्हॉल्व दुरुस्तीच्या कामामुळे पादचाऱ्यांचे हाल; कोपरखैरणेत तीन टाकी परिसरात पदपथ बंद

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआयडीसी असल्याने आजूबाजूला अनेक केमिकल कंपन्या असून त्यांना आग लागू नये याची काळजी घेतली जात आहे. आग लागलेल्या कंपनीत अडकले ,कुणाला दुखापत झाल्याचे अद्याप वृत्त नाही.