नवी मुंबई : मुंबई कृषि उत्पन्न भाजीपाला बाजारात पावसामुळे राज्यातून दाखल होणाऱ्या पालेभाज्यांची आवक घटली असून कोथिंबीर आणि मेथीच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. सततच्या पावसामुळे बाजारात भिजलेल्या पालेभाज्या दाखल होत असून ३० ते ४० टक्के आवक घटली आहे. त्यामुळे घाऊक बाजारात मेथी आणि कोथिंबीरच्या दरात ५ रुपयांनी वाढ झाली असून पालेभाज्यांचे दर चढेच राहतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

एपीएमसी भाजीपाला बाजारात बुधवारी ६४४ गाड्या दाखल झाल्या आहेत. मात्र यामध्ये पालेभाज्यांची आवक घटली आहे. विशेषतः मेथी आणि कोथंबीरची ३० ते ४० टक्के आवक कमी झाली आहे. सोमवारी कोथिंबीरच्या ५८ तर मेथीच्या १५ गाड्या दाखल झाल्या होत्या पंरतु बुधवारी कोथिंबीरच्या ४२ आणि मेथीच्या ७ गाड्या दाखल झाल्या असून १५७००० क्विंटल कोथंबीर तर २९८००क्विंटल मेथी दाखल झाली आहे. तसेच २७१०० क्विंटल शेपू तर १४९४०० क्विंटल पालक दाखल झाली आहे.

हेही वाचा : खारघर उपनगरामधील खड्डे बुजविण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आधी घाऊक बाजारात १५-२० रुपयांनी उपलब्ध असलेली मेथी आता २०-२५ रुपये तर कोथिंबीर २५-३० रुपयांवरून ३०-३५ रुपयांवर विक्री होत आहे. शेपू १५-२० रुपये तर पालक १०-१५ रुपयांनी विक्री होत आहे. तेच किरकोळ बाजारात मेथीचे प्रमाण तुरळक आढळत असून दरवाढ झाली आहे. मेथीची जुडी किरकोळ बाजारात ४० ते ५० रुपयांवर तर कोथिंबीर मोठी जुडी ३५-४० रुपयांनी विकली जाते. पुढील कालावधीत पालेभाज्यांचे दर चढेच राहतील, अशी माहिती व्यापारी संदेश धावले यांनी दिली आहे.