पनवेल : तालुक्यातील दापोली गावातील ३२ वर्षीय इलेक्ट्रोनिक्स अभियंता सोमवारी पहाटे पाच वाजता कळंबोली टी पॉईंट ते कळंबोली सर्कलकडे जाणाऱ्या सेवा रस्त्यावरील अपघातामध्ये ठार झाला. याबाबत पनवेल शहर पोलीसांनी करंजाडे येथे राहणाऱ्या ४० वर्षीय मोटारचालकाविरोधात गुन्हा नोंदविला आहे. मृत अभियंत्याचे नाव राहुल जितेकर असे आहे. राहुल हा सोमवारी पहाटे काम संपवून घरी स्कुटीवरुन येत असताना त्याला चिंचपाडा पुलावरुन सेवा रस्त्यावर जात असताना सूझुकी कंपनीच्या सेलेरीओ या मोटारीने राहुलला धडक दिल्याने राहुल याचे डोके थेट सेलेरीओ मोटीरीच्या पुढील काचावर आदळले.

हेही वाचा : नवी मुंबई : चिटफंड घोटाळ्यात २६ कोटींची फसवणूक; व्याप्ती वाढण्याची शक्यता, मुख्य आरोपीसह चार जणांना अटक

व्हीएनआयटीतून वाहतूक सुरू होऊनही कोंडी फुटेना.....एकेरी वाहतुकीमुळे वाहनचालकांमध्ये संताप....
व्हीएनआयटीतून वाहतूक सुरू होऊनही कोंडी फुटेना…..एकेरी वाहतुकीमुळे वाहनचालकांमध्ये संताप….
Roha Diva Memu schedule changes Mumbai
रोहा-दिवा मेमूच्या वेळापत्रकात बदल
Gang, robbers, Kharghar,
खारघरमध्ये कोयताधारी दरोडेखोरांची टोळी सक्रिय
Panvel Municipal Administration, First Traffic Regulation Park in Kharghar, road Safety Education, panvel, Kharghar, Kharghar news, panvel news, latest news, marathi news
खारघरमध्ये वाहतूक नियमन शिकवणारे पहिले उद्यान
Anant Ambani Radhika Merchant wedding
अनंत-राधिकाच्या लग्नामुळे मुंबईतल्या हॉटेलांचे दर वाढले, तब्बल ‘इतक्या’ हजारांनी वाढलं एका दिवसाचं भाडं
rain, Mumbai, western suburbs,
मुंबईत कुठे किती पाऊस ? पश्चिम उपनगरात १६५.९३, मुंबई शहरात ११५.६३ मिलीमीटर पाऊस
plaster, ceiling, building, Thane,
ठाण्यात इमारतीच्या छताचे प्लास्टर कोसळले, दोन वर्षांचा मुलगा जखमी
water shortage, Dombivli,
डोंबिवली जीमखाना रस्त्यावरील वस्तीमध्ये तीव्र पाणी टंचाई, रहिवाशांचे डोंबिवली एमआयडीसी कार्यालयात ठिय्या आंदोलन

या अपघातामध्ये राहुलच्या डोक्याला व चेहऱ्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे कामोठे येथील महात्मा गांधी मिशन रुग्णालयाच्या डॉक्टरांनी सांगितले.  या प्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक उद्धव सोळंके यांनी मोटारचालक ४० वर्षीय कैलास खारडे याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.