नवी मुंबई : शेती उत्पादनात गुंतवणूक करा आणि महिना ५ टक्के नफा व ११ महिन्यांनी मूळ रक्कम परत अशी आकर्षक जाहिरात करीत एका कंपनीने एजंटद्वारे ३०० लोकांची २६ कोटीची फसवणूक केल्याचे समोर आले आहे. याबाबत फिर्यादीने दिलेल्या तक्रार अर्जाची छाननी करीत संबंधित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. याबाबत एपीएमसी पोलीस तपास करीत आहेत.

नितीन पार्टे, दीपक सुर्वे, अमोल जाधव, सचिन भिसे अशी यातील आरोपींची नावे असून यापैकी मुख्य आरोपी पार्टे व अन्य दोघांना अटक करण्यात आली आहे. तर एकाचा शोध सुरु आहे. नितीन पार्टे संचालक असलेली रुद्रा ट्रेडर्स नावाची फर्म आहे. वाशीतील सर्वात आलिशान व्यावसायिक संकुल म्हणून ओळख असलेल्या सतरा प्लाझा येथे त्याचे कार्यालय आहे. मसाला आणि सुका मेवा याच बरोबर थेट शेतावर जाऊन शेतमाल खरेदी करत निर्यात करण्याचे काम ही फर्म करते असे सर्वत्र भासवले जात होते. याशिवाय पार्टे हा लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी नावाच्या पतसंस्थेचा संचालकही आहे. या दोन्हीच्या जिवावर पार्टे याने ३०० गुंतवणूकदारांची २६ कोटी रुपयांची फसवणूक केली.

Dilemma of onion growers for 14 months in last five years
गेल्या पाच वर्षांतील १४ महिने कांदा उत्पादकांची कोंडी
man lose over rs 20 lakhs in fake stock market trading scams
शेअर ट्रेडींगमध्ये अधिकचा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने साडेबावीस लाखांची फसवणूक
Loksatta explained What are the reasons for the fall of the rupee against the dollar and what are its consequences
गेल्या १० वर्षांत २८.३ टक्के घसरण… डॉलरपुढे रुपयाची घसरण आणखी कुठपर्यंत? कारणे काय? परिणाम काय?
High rate of gold prices in the domestic market
सोन्याचा सार्वकालिक उच्चांक; मुंबईत तोळ्यामागे घाऊक भाव ७०,४७० रुपयांवर

हेही वाचा…उरण : भूखंड ताबा देण्याचा मुहूर्त हुकणार? जेएनपीटी प्रकल्पग्रस्तांचा सिडको आणि बंदर प्रशासनाविरोधात संताप

आम्ही थेट शेतात बांधावर जाऊन शेतमाल खरेदी करून निर्यात करतो, त्यामुळे नफा फार मोठा मिळतो. तुम्हीही गुंतवणूक करा, जेवढी गुंतवणूक त्याच्या पाच टक्के दर महिन्यात परतावा मिळणार तसेच गुंतवलेली मूळ रक्कम ११ महिन्यांनी मिळणार असे आमिष दाखवून पैसे घेतले जात होते. हा व्यवहार पारदर्शक आहे हे भासवण्यासाठी लक्ष्मी प्रसाद को ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी या पतसंस्थेचे धनादेश, फिक्स डिपॉझिट बॉण्ड गुंतवणूकदारांना दिले जात होते. हा सर्व प्रकार मार्च २०२२ पासून सुरु होता. मात्र परताव्याचे पैसे मिळत नाहीत आणि ज्यांनी पैसे घेतले ते उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यात मुख्य आरोपी पार्टे हा बहुतांश वेळेस देशाबाहेर असतात. त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री अनेकांना पटली.

अखेर याबाबत काही दिवसापूर्वी महेंद्र डेरे या गुंतवणूकदराने एपीएमसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याची तात्काळ दखल घेत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय शिंदे यांनी पथक नेमले . सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक दामले पोलीस उपनिरीक्षक निलेश महाडिक यांच्यासह पथकाने अगोदर सर्व प्रकराची शहानिशा केली. याबाबत आरोपींना गाफिल ठेवण्यात आले आणि सर्व प्रकाराची खात्री पटल्यावर सर्व कागदपत्रे जमा होताच गुरुवारी रात्री आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता असून गुंतवणूकदारांनी पुढाकार घेत एपीएमसी पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा असे आवाहन एपीएमसी पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा…शासकीय आस्थापनांनी आचारसंहिता लागू झाल्याने नवी मुंबई, पनवेल मधील ठिकठिकाणचे फलक हटविले

अनेकांची आयुष्यभराच्या पूंजीची गुंतवणूक

याप्रकरणी पोलिसांनी आर्थिक फसवणूक, आमिष दाखवणे, चिट्स अँड मनी सर्कुलेशन कायदा, बॅनिंग ऑफ अनरेग्युलेटेड कायदा, वित्तीय संस्थांमधील हितसंबंध संरक्षण या कलमान्वये आरोपींवर गुन्हा नोंद केला आहे. यात पैसे गुंतवणारे अत्यंत सामान्य कुटुंबातील लोक असून प्रसंगी अनेकांनी उत्तम परतावा मिळतो म्हणून जमीन गहाण ठेवून, सोनेनाणे विकून काहींनी गहाण ठेवून तर काहींनी आयुष्यभर जमा केलेली पुंजी यात गुंतवली आहे असेही अनेक उदाहरणे समोर आली आहेत.