पनवेल : पनवेलमध्ये सर्वाधिक ८० हून जास्त खदाणी व क्वाॅरी आहेत. कुंडेवहाळ गावातील क्वाॅरीमध्ये सोमवारी दुपारी दोन वाजता झालेल्या सूरुंग स्फोटामध्ये क्वाॅरीवर काम करणाऱ्या एका पोकलेन चालकाच्या पाठीवर स्फोटानंतर उडालेल्या मोठ्या दगडांचा मारा अंगावर पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर दोन कामगार जखमी झाले. या घटनेत जीव गमावलेल्या पोकलेन चालकाचे नाव अविनाश केशव कुजूर असे आहे. याबाबत पनवेल शहर पोलीसांनी क्वाॅरीमध्ये सुरुंगाव्दारे स्फोट घडविणाऱ्या ५३ वर्षीय कुलामणी राऊत याच्याविरोधात गुन्हा नोंदविला आहे.

७० ते ८० मीटर अंतरावर हे कामगार व पोकलेन चालक उभे असताना स्फोट केल्याने ही घटना घडली. अॅन्थोनी भोईर यांची कुंडेवहाळ गावात क्वाॅरी आहे. १८ वर्षीय अंकीत शहा, कामावर देखरेख करणारे अंकुश निरगुडा तसेच पोकलेन चालक कजूर यांच्या अंगावर दुपारी दोन वाजता अचानक स्फोट झाल्याने दगड उडाले. हे तीघेही जखमी झाले. मात्र या दगडांचा मारा एवढा जबरदस्त होता की या माऱ्यामध्ये पोकलेन चालक कुजूर हा जागीच ठार झाला. त्याच्या पाठीवर उजव्या बाजूला मोठ्या दगडाचा फटका बसल्याने तो जागीच ठार झाला. याबाबत पनवेल शहर पोलीसांनी भारतीय दंड संहिता १८६०, ३०४ अ अंतर्गत रितसर तक्रार नोंदविली असल्याची माहिती पनवेल शहर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नितीन ठाकरे यांनी दिली.

हेही वाचा : मराठा आरक्षण आंदोलनाचा जेएनपीए बंदराला फटका, कंटेनर न आल्याने निर्यातीची जहाजे बंदरात अडकली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेलमधील व्काॅरीवरील स्फोटात सोमवारी एकाचा जीव गेल्यामुळे पनवेल व उरणमधील सर्वच खदाणी व व्काॅरी मालकांकडे सूरुंग स्फोट घडविणारे कामगार हे कुशल आहेत का असा प्रश्न निर्माण झाला आहे. स्फोट झाल्यावर आणि व्काॅरीमधून दगड काढताना संरक्षित जाळी लावणे तसेच भोंग्याने दवंडी देणे अपेक्षित होते. यापूर्वी वहाळ ग्रामपंचायतीच्या लोकप्रतिनिधींनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे या खदाणी व व्काॅरीमध्ये हवेतील प्रदूषण वाढल्याची तक्रार केली होती.