पनवेल : खारघरमध्ये पतीने पत्नीचा खून करुन स्वत: आत्महत्या केल्याची घटना सेक्टर ३४ येथील डाॅल्फीन प्राईड सोसायटीत सोमवारी सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत दाम्पत्यांचे वय ३५ ते ४५ वर्षे असून हे दाम्पत्य मूळचे पाकीस्तानचे नागरिक आहेत. ६ महिन्यापूर्वी ते भारतात पर्यटन व्हीजावर आले होते. या दाम्पत्यांमध्ये सतत भांडणे होत असल्याची या दाम्पत्याच्या नातेवाईकांनी पोलिसांना सांगितले.

खारघर पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करीत आहे. या दाम्पत्याला १० आणि सहा वर्षांची दोन मुले आहेत. पतीने सोमवारी त्याची मुले शाळेसाठी घरा बाहेर गेल्यावर चाकूच्या साहाय्याने पत्नीवर स्वयंपाक घरातील चाकूच्या साह्याने वार करुन खून केला. या घटनेची माहिती सेक्टर ६ येथे राहणा-या ४६ वर्षे वयाच्या महिलेने पोलिसांना दिली. ही महिला मृत महिलेची बहीण आहे. या महिलेने पोलीसांना दिलेल्या माहितीनुसार ३५ वर्षीय सपना नोतन दास हीला तीचा ४५ वर्षीय पती नोतन उर्फ संजय सचदेव याने गळ्यावर पाठीवर आणि खांद्यावर चाकूने वार करून ठार केले. त्यानंतर त्याने स्वत:चा गळा त्याच चाकूने कापून स्वत: आत्महत्या केली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुले ज्यावेळी शाळेतून घरी आली त्या वेळी घराचा दरवाजा न उघडल्याने शेजारच्या व्यक्तींच्या मदतीने मुलांनी नातेवाईकांना संपर्क साधला. यानंतर खारघर पोलिसही घटनास्थळी पोहोचले. संजय सचदेव हा त्याच्या नातेवाईकांच्या वाशी येथील ड्रायफ्रुट बाजारात व्यावसायात काम करत होता. मात्र संजय व सपना यांच्यात सतत वाद सुरू होते. सपना हीने संजयला अनेकदा स्वभावात सुधारणा होईल या अपेक्षेने नातेवाईकांना या भांडणाची माहिती दिली नाही मात्र अखेर संजयने सपना हीची हत्या करुन स्वत:ची जीवनयात्रा संपवली.