पनवेल : मुंबई ऊर्जा कंपनीचे टॉवर पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी उभारले जात आहेत. मात्र शेतकऱ्यांशी तडजोड न करता थेट भूसंपादन होत असल्याने शेतकऱ्यांमध्ये असंतोष आहे. शनिवारी टेंभोडे गावामध्ये टॉवरचे काम सुरू असलेल्या ठिकाणी पनवेल येथील महाविकास आघाडीच्या विविध राजकीय पक्षांनी एकत्र येऊन विरोध केला. खांदेश्वर पोलीसांनी विरोध करणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना ताब्यात घेऊन त्यांना पोलीस गाडीतून पनवेल तालुका पोलीस ठाण्यात आणले. मात्र शेकापचे माजी आ. बाळाराम पाटील यांच्यासह अनेक नेत्यांनी आम्ही गाडीत झोपूनच राहू, अशी भूमिका घेतली. पोलीसांनी त्याच अवस्थेमध्ये आंदोलकांना कोठडीत टाकण्याची भूमिका घेतल्याने पोलीस व महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये शाब्दिक संघर्ष सुरू झाला.

हेही वाचा : सिडको वसाहतींमधील हिरवळ आणि डोंगरांगांचे दर्शन घडवत ‘खारघरची राणी’ निघाली

mumbai municipal corporation, transparent administration
मुंबई महापालिकेचा कारभार पारदर्शी होणार? नागरिकांशी संवाद, संपर्क वाढविण्याचे मनपा आयुक्तांचे अधिकाऱ्यांना आवाहन
Traffic congestion, Divisional Commissioner office area,
विभागीय आयुक्त कार्यालय परिसरातील वाहतुकीचा बोजवारा, वाहनचालकांना पाच ते दहा किलोमीटरचा वळसा
BJP candidate Ramdas Tadas has two offices in the city without obeying the order of Amit Shah
अमित शहांचा आदेश पाण्यात, भाजप उमेदवाराची शहरात दोन कार्यालये
Trinamool Congress MPs protesting in front of the Central Election Commission headquarters protested at the police station
तृणमूलचे ‘राजकीय नाटय़’; केंद्रीय तपास यंत्रणांविरोधात पोलीस ठाण्यात २४ तास ठिय्या आंदोलन

पोलीसांसमोर आंदोलकांच्या या पवित्र्यामुळे नवा पेच उभा राहीला. अखेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अनिल पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपुत, पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी अनेकदा विनंती केल्यानंतरही आंदोलक पोलीस गाडीच्या खाली उतरले नाहीत. रात्रीचे सात वाजेपर्यंत आंदोलक गाडीतच बसण्यावर ठाम होते. अखेर ही बातमी परिसरात समजताच शेकाप व काँग्रेस आणि शिवसेनेचे कार्यकर्ते पनवेल तालुका पोलीस ठाण्यात जमा होऊ लागले. पोलीसांनी ताब्यात घेतलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये काँग्रेसचे सुदाम पाटील, शिवसेना (ठाकरे गट) बबन पाटील यांचा समावेश होता. रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रश्नावरून येत्या सोमवारी बैठक लावण्याचे आश्वासन दिले होते. तरीही मुंबई उर्जा कंपनीने पोलीस बळाचा वापर करून काम करण्याची भूमिका घेतल्याने हा संघर्ष झाला.