पनवेल : पनवेलच्या काही भागात मागील दोन दिवसांपासून पिण्याचे पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. त्यातच शुक्रवारी, जागतिक जलदिनानिमित्त सिडकोच्या पाणी पुरवठा विभागातर्फे कामोठे येथे जलबचतीचा संदेश सामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रभात फेरीचे आयोजन केले आहे. मात्र दोन दिवसांपासून शहरासह नवीन पनवेल आणि कळंबोली या वसाहतींमध्ये पिण्यासाठी पाणी पुरवठा नसताना पाणी बचतीपूर्वी पिण्यासाठी पाणी तरी द्या, अशी मागणी पोटतिडकीने गृहिणींकडून केली जात आहे.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

हेही वाचा – मोहिते-पाटलांच्या घराण्यात उमेदवारी नाकारण्याचा ५२ वर्षांतील दुसरा प्रसंग

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आंतरराष्ट्रीय विमानतळासहीत दळणवळण आणि विकासाचे प्रकल्प पनवेल शहरात होत असले तरी सध्या पनवेलकर तहानेने व्याकुळ आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून बुधवारी सकाळी पाणी पुरवठा सुरू झाला तरी गुरुवारी दुपारपर्यंत मोठ्या पाणीटंचाईचा सामना पनवेलकरांना करावा लागला आहे. उन्हाचा पारा चढा असताना नवीन पनवेलच्या काही भागात पाणी मिळत नसल्याने पंचशील नगरच्या झोपडपट्टी शेजारी जाऊन पिण्याच्या पाण्यासाठी एमजेपीच्या फुटलेल्या जलवाहिनीवरून २० लिटर बाटला पाणी घरी घेऊन जाण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. अपुरा पाणी पुरवठ्यासाठी माफक दरात पाण्याचे टँकर सुरू न केल्यामुळे अधिकचे पैसे देऊन नागरिकांना पाणी घ्यावे लागत आहे.