नवी मुंबई : कुठलीही पूर्व सूचना न देता मान्सून पूर्व कामासाठी आज सहा तास घणसोलीत वीज पुरवठा बंद करण्यात आला होता . यामुळे या परिसरातील हजारो नागरीकांना मनस्ताप सहन करवा लागला. वाढलेल्या झाडांच्या फांद्यााचा उंचावरील वीज वाहिन्यांना धोका असतो , त्यामुळे महावितरणकडून झाडांची छाटणी करण्यात येते. यासाठी तसंच मान्सून पूर्व कामांसाठी विविध कामे महावितरणकडून केली जातात. या कामांसाठी हा वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. वीज पुरवठा खंडीत केला जाणार आहे याची माहिती देखील सोशल मिडियाच्या माध्यामातून नागरिकांना देण्यात आल्याचा दावा महावितरणने केला. मात्र बहुतांश नागरीकांपर्यंत ही माहिती पोहचली नसल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागला, नागरीकांनी संताप व्यक्त केला.