उरण : छत्रपती शिवाजी महाराजांनी देशाच्या सागरी साम्राज्य आणि व्यापाराचा पाया रचला असे मत मंगळवारी जेएनपीए बंदरात आयोजित शाश्वत व हरित कॉरिडॉर या विषयांवरील आयोजित इंडिया मेरिटाइम संमेलनात बोलतांना व्यक्त केले. देशाच्या चोल साम्राज्यात सागरी व्यापार बहरला होता. मात्र सागरी सुरक्षा आणि व्यापार या विषयी दूरदृष्टी असलेल्या महाराष्ट्र आणि देशाचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांनी सागरी साम्राज्याचे सत्तेचे महत्व अधोरेखित केले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
सिंगापूरच्या पोर्ट ऑफ सिंगापूर यांच्या व जेएनपीएच्या भागीदारीतून जेएनपीए मध्ये सर्वात मोठे बंदर उभारले जात आहे. या बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाची पाहणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व सिंगापूरचे उप पंतप्रधान ग्यान किंग यांग यांच्यासह सिंगापूरच्या शिष्टमंडळाने केली. हे बंदर पुढील पूर्णपणे कार्यान्वित होणार आहे. या बंदराचे उदघाटन दोन्ही देशांच्या पंतप्रधानाच्या उपस्थित करण्यात येणार आहे.
या भागीदारीमुळे भारत आणि सिंगापूर बरोबरच सिंगापूर आणि महाराष्ट्र यांच्यातील भागीदारी ही आणि जागतिक व्यापाराचे दार उघडले असून भविष्यात भारत जागतिक व्यापारात आपला ठसा उमटविल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. जेएनपीए मधील पोर्ट ऑफ सिंगापूर हे येथील ५० टक्के कंटेनर हाताळणी करणारे बंदर ठरणार आहे. त्यामुळे राज्याच्या आणि देशाच्या व्यापाराला चालना मिळणार असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
तर पालघर येथे प्रस्तावित वाढवण बंदर हे देशातीलच नव्हे तर जगातील प्रमुख दहा बंदरातील एक बंदर म्हणून गणले जाणार असून तेही लवकरच कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी सिंगापूरचे उप पंतप्रधान यांनी जागतिक वातावरणीय बदलाच्या परिणामाचा सामना करण्यासाठी शाश्वत आणि हरित कॉरिडॉर ची आवश्यकता पुढील भविष्यासाठी हा करार केला जात असून सिंगापूर आणि भारताच्या व्यापाराला ६० वर्षे पूर्ण होत आहेत. यात वृद्धी करण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला तर बंदराचा करार हा ३० वर्षासाठी करण्यात आला असून या बंदरामुळे स्थानिकांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल असे मत त्यांनी व्यक्त केले.
यावेळी सिंगापूरचे जल वाहतूक मंत्री जेफ्रि सीओ यांनीही या दोन देशातील व्यापार वृद्धिंगत होण्याची अपेक्षा व्यक्त केली. तर केंद्रीय जल वाहतूक व जहाज मंत्री सरबानंद सोनेवाल यांनी व्हिडीओ संदेश पाठवून शुभेच्छा दिल्या.भारत आणि सिंगापूर यांच्यातील हरित आणि शाश्वत मेरिटाइम कॉरिडॉर तयार करण्यासाठी या संमेलनात अनेक मान्यवरांनी आपली मते मांडली. विभागाला राज्य सरकार कडून सर्वोतोपरी सहकार्य केले आहे.
वाढवण बंदराचे काम वेळेत पूर्ण करणार,हरित आणि डिजीटल मेरिटाइम विकास करील असा विश्वास केंद्रीय जहाज व जलवाहतूक सचिव टी के रामचंद्रन यांनी व्यक्त केले. तर जेएनपीए आणि वाढवण बंदराचे अध्यक्ष उन्मेष शरद वाघ यांनी येत्या काळात मेरिटाइम क्षेत्रात हरित कॉरिडॉर निर्माण करण्यासाठी ऑक्टोबर मध्ये मुंबईत इंडिया मेरिटाइम संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती दिली.