उरण : पावसाळा सरल्याने पाण्यामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यात उन्हामुळे धूळ निर्माण झाली आहे. या धूळ आणि खड्ड्यांचा सामना करीत नागरिकांना प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे करोना नंतर पुन्हा एकदा तोंडाला मुखपट्टी(मास्क) लावून प्रवास करण्याची वेळ आली आहे. उरण तालुक्यातील अनेक प्रमुख रस्त्यांवरून दररोज हजारो अवजड वाहनांची ये-जा असते. या वजनी वाहनांच्या तुलनेत बांधलेले रस्ते हे कमकुवत व हलक्या दर्जाचे आहेत. त्यामुळे रस्ता तयार केल्या नंतर काही महिन्यांतच या रस्त्यांना भले मोठे खड्डे पडतात. पावसाळ्यात तर या खड्ड्यात अधिकची भर पडते. त्यामुळे हे खड्डे मोठे होत जातात.

हेही वाचा : Video : नवी मुंबई पोलिसांची बेफिकरी आणि चपळता, दोन्हींचे उदाहरण एकाच वेळी….बघा नक्की काय घडलं

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
CM Devendra Fadnavis on LOP
CM Devendra Fadnavis on LOP: विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद…

ते वेळेत न बुजविल्याने रस्त्यावर खड्ड्याची संख्या वाढते. परिणामी खड्डेच रस्ते बनतात. अशी स्थिती उरण मध्ये आहे. यामध्ये उरणच्या द्रोणागिरी, खोपटा कोप्रोली, चिर्ले दिघोडे तसेच उरण पनवेल मार्गावरील नवघर ते बोकडवीरा व खोपटे पूल ते राष्ट्रीय महामार्ग हा कोस्टल रस्ता यावर प्रचंड प्रमाणात खड्डे पडून त्यातील खडीची धूळ निर्माण होत आहे. त्यामुळे पावसाळ्यातील खड्ड्या नंतर प्रवासी व नागरिकांना आता धुलीकणांचा सामना करावा लागत असून याचा परिणाम श्वसनाचे आजार बळावण्यात झाला असून तातडीने रस्त्यावरील खड्डे भरावेत अशी मागणी उरण मधील सामाजिक कार्यकर्ते आशिष घरत यांनी केली आहे.

Story img Loader