उरण : अनेक दिवसांपासून वातावरणात प्रचंड ऊन आणि सुरु झालेला गारठा, त्यात बुधवारी आलेल्या अवेळी पावसाच्या सरी आशा सततच्या वारंवार बदलणाऱ्या वातावरणामुळे खोल समुद्रातील मासळी तळाला जाऊ लागली आहे. त्यामुळे मासळीची आवक घटण्याची शक्यता आहे. परिणामी मासळीच्या दरातही वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे ऐन दिवाळीत खवय्यांबरोबर मच्छिमारही आर्थिक संकटात सापडले आहेत. या स्थितीत मासेमारीसाठी केलेला खर्च ही वसूल होत नसल्याने मच्छिमारांचे आर्थिक नुकसान होऊ लागले आहे.

प्रत्येक बदलत्या वातावरणाचा मासेमारी व्यवसायावर परिणाम होतो. त्यानुसार सध्या वातावरणातील ऊन आणि गारव्यामुळे मासळी एका ठिकाणी राहत नसल्याने याचा परिणाम मासेमारी वर झाला आहे. त्यामुळे तापमानाच्या शोधत मासे समुद्राच्या तळाला जाऊ लागले आहेत. त्यामुळे मासेमारी साठी गेलेल्या बोटीना आवश्यक त्या प्रमाणात मासळी मिळत नसल्याने मच्छिमारांनी केलेला खर्चही निघणे जिकरीचे झाले आहे. त्यामुळे मच्छिमारांना नुकसान सहन करावा लागत आहे. यापूर्वी मच्छिमारांना पावसाळी बंदी, सातत्याने येणारी वादळे, गारव्यात थंडीचा परिणाम यामुळे मासळी मिळत नाही. या अनेक संकटासह सरकारकडून मच्छिमारांना देण्यात येणारे अनुदान वेळेत न मिळणे यांचाही सामना करावा लागत आहे. यावर्षी थंडीचे प्रमाण वाढल्याने पुन्हा एकदा मच्छिमारांवर संकट आले आहे.

हेही वाचा : नवी मुंबईत सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; १७ वर्षीय मुलगी निघाली मास्टरमाइंड, चौघींची सुटका

हेही वाचा : उरणमध्ये अवेळी पावसाचा भात पिकाला फटका; शेतकऱ्यांची नुकसानभरपाईची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मच्छिमारांना खोल समुद्रातील मासेमारीच्या एका फेरीसाठी ३ ते साडेतीन लाख रुपयांचा खर्च येतो. मात्र सध्या मासळीचे प्रमाण कमी झाल्याने मच्छिमारांना मिळणारी मासळी कमी झाली आहे. त्यामुळे यासाठी करण्यात आलेला खर्च ही निघत नाही. ही स्थिती काही दिवस राहील अशी माहिती मच्छिमारांनी दिली आहे. तर वातावरणातील बदलामुळे मासेमारीवर परिणाम झाला असल्याचे मत करंजा येथील मच्छिमार विनायक पाटील यांनी दिली आहे.