पनवेल : पनवेलमध्ये सर्दी, खोकला, अंगदुखी व तापाचे रुग्ण मागील महिन्यापासून वाढले असून जानेवारी महिन्यात पनवेल महापालिकेच्या सर्वच आरोग्यवर्धिनी, आपला दवाखाना, आरोग्यवर्धिनी उपकेंद्र या सगळ्यांमध्ये या साथरोगाचे २६७५ रुग्णांची नोंद झाली आहे. ही लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण वाढले असून त्यांनी पालिकेच्या दवाखान्यांमध्ये जाऊन मोफत औषध उपचार घ्यावेत असे पालिकेने आवाहन केले आहे.

पनवेल महापालिकेत्या आरोग्यवर्धिनी केंद्रामध्ये करोना साथरोगाची चाचणी केली जाते. संबंधित लक्षणे असलेला साथरोग हा करोनाची लक्षणे असला तरी तो करोना नसल्याची माहिती पालिकेचे वैद्याकीय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांनी दिली.

हेही वाचा >>>पाणजे पाणथळीबाबत १२ आठवड्यांत निर्णय घेण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पनवेल महापालिकेच्या वैद्याकीय दवाखान्यातून औषधोपचार केल्यास चार दिवसात संबंधित व्हायरसचे रुग्ण बरे होतात. मात्र त्यादरम्यान अंगदुखी, डोकेदुखी, अशक्तपणा रुग्णांना जाणवतो. डॉ. गोसावी यांनी हा साथरोग इन्फ्ल्यून्झा लाईक इलनेस (आयएलआय) सदृश असल्याची शक्यता वर्तविली आहे. या साथरोगात ही लक्षणे आढळतात. मात्र गोळ्या औषधांसोबत रुग्णांनी पुरेसे पाणी पिणे आवश्यक आहे. मात्र तरीही हा आजार बरा होत नसल्यास तातडीने पालिकेच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असे आवाहन डॉ. गोसावी यांनी केले आहे.