लोकसत्ता प्रतिनिधी

नवी मुंबई : वाशीतील मुंबई कृषी उत्पन्न फळ बाजारात मेअखेर कोकणातील हापूसचा हंगाम संपताच जुन्नर आंबा हंगामाला सुरुवात होते. बाजारात सध्या ३ ते ४ गाड्या दाखल होत आहेत. प्रतिडझन जुन्नर आंब्याला ५०० ते ९०० रुपये दर आहे. मात्र यंदा हंगामाला उशिराने सुरुवात होत आहे.

Heavy rains in Mumbai till Friday Meteorological Department warns
Mumbai Heavy Rain : मुंबईत शुक्रवारपर्यंत अतिवृष्टी, हवामान विभागाचा इशारा
Mumbai Weather Today Heavy Rain Gusty Storm
Mumbai Rains Update : मुंबईसह आसपासच्या परिसरात रात्रीपासून मुसळधार पाऊस, बेस्ट आणि लोकल वाहतूक मंदावली
Mumbai Faces Heavy Rains, heavy rains in Mumbai, heavy rainfall in Mumbai, Meteorological Department, Continued Downpours in Mumbai, Mumbai suburbs, Mumbai rain, Mumbai news, marathi news, loksatta news,
मुंबई : उपनगरांत मुसळधार, रात्रभर कुठे किती पाऊस?
heavy rain in umbai create waterlogging troubles
मुंबई शहर, उपनगरांत संततधार; आज मुसळधार तर उद्या अतिमुसळधार पावसाचा अंदाज
Chance of heavy rain in Mumbai today Mumbai
मुंबईत आज मुसळधार पावसाची शक्यता
Heavy rain, mumbai, MLA, stuck,
मुंबई तुंबली अन् आमदार नागपूर विमानतळावर अडकले
rain, Mumbai, western suburbs,
मुंबईत कुठे किती पाऊस ? पश्चिम उपनगरात १६५.९३, मुंबई शहरात ११५.६३ मिलीमीटर पाऊस
schools, colleges, Mumbai,
मुंबई महानगरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना दुपारच्या सत्रातही सुट्टी, मुंबई महानगरपालिकेचा निर्णय

पावसाळी फळांच्या हंगामाला सुरुवात झाली असून बाजारात आता केशर, नीलम, तोतापुरी, राजापुरी, बलसाड या जातीचे आंबे दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. मेअखेरीस बाजारात जुन्नर हापूस दाखल होण्यास सुरुवात होते. मात्र सध्या बाजारात कमी प्रमाणात जुन्नर हापूस दाखल होत असून जूनमध्ये आवक वाढेल, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे.

आणखी वाचा-नवी मुंबई महापालिकेतील शहर अभियंतापदी कुणाची निवड?

अवकाळी पावसामुळे यंदा छाटणी उशिराने झाली. त्यामुळे बाजारात जुन्नर आंबे दाखल होण्यास विलंब होत आहे, अशी माहिती व्यापारी संजय पिंपळे यांनी दिली आहे. जून १० नंतर बाजारात जुन्नर हापूस वाढणार आहे. सध्या बाजारात जुन्नर हापूसच्या ३ ते ४ गाड्या दाखल होत आहेत. जुन्नर हापूस प्रतिडझन ५००-९०० रुपयांनी विक्री होत आहे.