महापे, घणसोली वसाहतीत आपत्कालीन स्थितीत तातडीने पोहोचता येणार

नवी मुंबई उद्घाटनानंतर तब्बल नऊ महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर अखेर कोपरखैरणे अग्निशमन केंद्र  १ डिसेंबरपासून कार्यान्वित झाले. हे केंद्र सुरू झाल्याने आता कोपरखैरणेसह घणसोली, महापे आणि औद्योगिक वसाहतीतील मोठय़ा भागात आपत्कालीन परिस्थितीत उद्भवल्यास तेथे वेळेत पोहोचणे शक्य होणार आहे.

credit card spending soar to 27 percent
क्रेडिट कार्ड उसनवारी २७ टक्क्यांनी वाढून १८.२६ लाख कोटींवर
Retail inflation hit a five month low of 4.85 percent in March
किरकोळ महागाई दर ४.८५ टक्के; पाच महिन्यांच्या नीचांकी घसरण
narendra modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नागपूर दौऱ्यात बदल ?
The central government fiscal deficit reached Rs 15 lakh crore at the end of February
वित्तीय तूट १५ लाख कोटींवर; फेब्रुवारीअखेर वार्षिक उद्दिष्टाच्या तुलनेत ८६.५ टक्क्यांवर

४ मार्च २०१९ रोजी कोपरखैरणे  अग्निशमन केंद्राचे महापौर जयवंत सुतार यांच्या हस्ते उद्घाटन  करण्यात आले होते. उद्घाटनासाठी  आणलेला पाण्याचा बंब दुसऱ्याच दिवशी हलविण्यात आला. त्यानंतर ही इमारत बेवारस अवस्थेत उभी होती.  वृत्तपत्रात याविषयी बातम्या छापून आल्यानंतर केंद्राच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नेमणूक करण्यात आली.

अग्निशमन केंद्रात लागणारी वाहने आणि प्रशिक्षित कर्मचारी आणि अधिकारी वर्ग नसताना इमारत उद्घाटनचा देखावा करण्यात आला होता. कोपरखैरणेतील पाचव्या अग्निशमन केंद्रामुळे शहरातील सुरक्षा अधिक सक्षम होईल, अशी आशा नागरिकांनी होत, मात्र उद्घाटन झाल्यानंतरही हे केंद्र बंद होते. त्यामुळे नागरिकांनी नाराजी व्यक्त केली होती. उद्घाटनानंतर मनुष्यबळाअभावी केंद्र बंदच होते. लोकसभा आचारसंहितेनंतर रखडलेली पालिकेची अग्निशमन भरती प्रक्रियाही पूर्ण करून रुजू करण्यात आले होते. पालिकेच्या अग्निशमन दलात १० वर्षांनंतरही भरती प्रRिया राबवली  गेली. कोपरखैरणे येथे   नवीन अग्निशमन केंद्र उभारण्यात आले आहे. भरती नंतर कार्यान्वित होणार असल्याचे आश्वसन देण्यात आले होते. ५२०० चौ.मी. क्षेत्रफळाच्या भूखंडावर सुनियोजित आणि अग्निशमन केंद्रासाठी आवश्यक अग्निशमन कर्मचारी, अग्निशमन वाहने, उपकरणे, चालक उपलब्ध आहेत.  केंद्रात ५४  कर्मचारी आणि तीन अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. दोन अग्निशमन बंब, एक रेस्क्यू टेंडर, एक जीप व एक पाण्याचा टँकर अशी सुसज्जता आहे. या केंद्रामुळे महापे, कोपरखैरणे औद्योगिक वसाहत वघणसोली भागात आपत्कालीन स्थितीत तातडीने पोहोचता येणार असल्याचे प्रभारी उपायुक्त  शिरीष आरदवाड यांनी सांगितले.

वित्तहानी टळणार

कोपरखैरणे, घणसोली, महापे आणि एमआयडीसी या भागात आग लागली असता वाशी वा ऐरोलीमधून अग्निशमनच्या गाडय़ा बोलावल्या जात होत्या, मात्र या दोन्ही ठिकाणी पोहोचण्यासाठी किमान चार किलोमीटरचे अंतर कापावे लागत होते. प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करीत घटना स्थळी पोहचत असल्याने उशीर होत होता. तोवर आगीने रौद्ररूप धारण केल्याने मोठय़ा प्रमाणावर वित्तहानी होत होती. ती आता टाळता येणार आहे.