नवी मुंबई: महापालिका रुग्णालयात आर्थिक व्यवहारातून झालेल्या कर्मचारी भरतीच्या चौकशीची मागणी

महापलिकेची कोणतीही मंजूरी नसताना साधारण  १७५ कामगारांकडून प्रती मानसी ४ते ४.५ लाख रुपये घेऊन त्यांची नेमणूक केली आहे.

hospital
महापालिका रुग्णालयात(संग्रहित छायचित्र)/ लोकसत्ता

नवी मुंबई महानगर पालिकेत जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ आणि त्यानंतरच्या कालावधीत ऐरोली, तूर्भे, नेरूळ, बेलापुर या रुग्णालयात आर्थिक व्यवहारातून मोठ्या प्रमाणात मनुष्यबळ भरती करण्यात आली आहे. त्यामुळे या भरती प्रक्रियेची चौकशी करून कारवाई करण्याची मागणी कामगार नेते मंगेश लाड यांनी लाच लुचपत विभागाकडे केली आहे. नवी मुंबई महानगर पालिकेच्या राजमाता जिजाऊ माता सार्वजनिक रुग्णालय ऐरोली, रामतनु माता माता बाळ रुग्णालय  तूर्भे, स्वर्गीय मीनाताई ठाकरे सार्वजनिक रुग्णालय नेरूळ, माता बाळ रुग्णालय बेलापुर या चार ही रुग्णालयात जाने २०२० ते ३१ मे २०२१ आणि त्यांनंतरच्या कालावधीत साधारण २०० पेक्षा जास्त कामगारांची भरती भारत विकास ग्रुप आणि ईएमजी या ठेकेदारांनी आर्थिक व्यवहारातून केली आहे.

हेही वाचा >>> प्रशासनाची अतिक्रमण विरोधी कारवाईकडे पाठ, नागरिक कृती समिती उतरणार रस्त्यावर

भारत विकास ग्रुप कंपनीच्या रुग्णालय व्यवस्थापकांनी या कालावधीत त्यांचा कार्यकाळ संपणार आहे हे माहीत असूनही नवी मुंबई महानगर महापलिकेची कोणतीही मंजूरी नसताना साधारण  १७५ कामगारांकडून प्रती मानसी ४ते ४.५ लाख रुपये घेऊन त्यांची नेमणूक केली आहे. या आर्थिक व्यवहारातून भरती झालेल्या कामगारांची, कोणतीही मंजूरी नसताना अतिरिक्त मनुष्य बळ कसे कार्यरत झाले? महापालिका अधिकाऱ्यांनी त्यांना कसे नियुक्त करून घेतले? जर मंजूरी नव्हती तर भारत  विकास ग्रुप यांनी इतके मनुष्य बळ का नियुक्त केले?  असे सवाल करत या भरती प्रक्रियेची चौकशी याबाबत वारंवार लेखी तक्रार  करूनही नवी मुंबई महानगर पालिका संबधित अधिकारी कोणतीही चौकशी करत नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकरणाची लाच लुचपत विभागाने चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी कामगार नेते मंगेश लाड यांनी लाच लुचपत विभागाचे महासंचालक यांच्या कडे केली आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-03-2023 at 20:02 IST
Next Story
प्रशासनाची अतिक्रमण विरोधी कारवाईकडे पाठ, नागरिक कृती समिती उतरणार रस्त्यावर
Exit mobile version