उरण : १७ जुलै १९४७ ला अरबी समुद्रातील कासाच्या खडका नजीक झालेल्या जगातील सर्वात मोठ्या बोट अपघाताच्या ७८ वर्षानंतर ही कोणतीही सुरक्षा व्यवस्था नसल्याने आजही या खडका नजीक बोटीचे अपघात होऊ लागले आहेत. त्यामुळे या मार्गाने ये जा करणाऱ्या प्रवास व मच्छिमार बोटींच्या सुरक्षेसाठी उपाययोजना करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात म्हणजे १७ जुलै १९४७ ला मुंबई वरून रेवस(अलिबाग)ला जाणाऱ्या संत रामदास बोटीला झालेल्या अपघातात ७०० पेक्षा अधिक प्रवाशांचा मृत्यू झाला होता. तर २६ जुलै ला याच परिसरात करंजा बंदरात येणाऱ्या मासेमारी बोट भरकटल्याने ती अलिबागच्या किनाऱ्यावर जाऊन दुर्घटनाग्रस्त झाली.

या बोटीवरील ८ पैकी पाच खलाशी वाचले तर तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. त्यानंतर हा या परिसराचा धोका अधिक गंभीर बनला आहे. उरण, दि. ३० २६ जुलै रोजी तुळजाई बोट कासा खडकाजवळ उलटून तीन खलाशांचा बळी गेला. मात्र याच ठिकाणी १७ जुलै १९४७ रोजी रामदास बोट दुर्घटनेत तब्बल ७०० प्रवाशांचा बळी गेला होता. आश्चर्य म्हणजे याच खडकाच्या परिसरात आतापर्यंत अनेक लहान मोठ्धा बोट दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे कासाचा खडक बोटींच्या अपघातामुळे ब्लॅक स्पॉट बनला असून उरणच्या समुद्रातील या खडका जवळून जाताना मच्छीमार तसेच प्रवासी बोटींतील प्रवाशांचा अक्षरशः थरकाप उडत आहे.

उरण-रेवसदरम्यानच्या समुद्र खाडीतील कासा खडक मागील ९५ वर्षांपासून मृत्यूचा सापळा बनला आहे. या सागरी मार्गावर प्रवासी वाहतूक करणाऱ्या बोटींना झालेल्या अपघातामुळे शेकडो लोकांना जलसमाधी मिळाल्याने मच्छीमार व सागरी प्रवाशांसाठी हा खडक यमदूत बनला आहे. २६ जुलै रोजी तुळजाई ही मासेमारी बोट डागडुजीसाठी करंजा बंदराकडे निघाली होती. मात्र कासा खडकाजवळ जाताच या बोटीचे इंजिन अचानक बंद पडल्याने बोट सासवण किनाऱ्यावर बुडाली. यात आठपैकी तीन खलाशी बुडाले. त्यामुळे १७ जुलै १९४७ साली याच सागरी मार्गावर घडलेल्या रामदास बोटीच्या अपघाताच्या आठवणी जाग्या झाल्या.

४०६ टन वजनाची असलेली रामदास बोट वादळी वाऱ्याचा सामना करण्यासाठी सुसज्ज होती. मात्र कासा खडकावर आदळल्याने रामदास बोट फुटली. या दुर्घटनेआधी कासा खडक परिसरात ११ नोव्हेंबर १९२७ रोजी एकाच दिवशी एस. एस. जयंती आणि एस. एस. तुकाराम या दोन प्रवासी बोटी बुडाल्या होत्या. या अपघातात जयंती प्रवासी बोटीतील ९६ तर तुकाराम बोटीतील १४३ प्रवाशांपैकी ४७ प्रवाशांना जलसमाधी मिळाल्याचे सांगितले जात आहे. यानंतर मागील ७५ वर्षांत या कासा खडकाजवळ छोट्या मोठ्या बोटींचे अनेक छोटे मोठे अपघात घडले आहेत. यामुळे उरण-रेवस समुद्रातील कासा खडक परिसर मच्छीमार व सागरी प्रवाशांसाठी  यमदूत बनला आहे.

उरणच्या समुद्रात घडत नसला तरी कासा खडकाजवळ आतापर्यंत अनेक बोट उलटून शेकडोजणांना आपला जीव गमवावा लागला आहे. या भागात अचानक वातावरण बदलून वादळ निमर्माण होत असल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. १९४७ मध्येही केवळ दहा वर्षे झालेली मजबूत रामदास बोट कासा खडकाजवळ उलटून सातशे लोकांचा बळी गेला होता. त्यामुळे या भागातून प्रवास करताना प्रवासी, पर्यटक तसेच मच्छीमारांना अलिबाग तालुक्यातील खंदेरीनजीक झालेल्या बोट अपघातातील मृत खलाशांच्या कुटुंबियांना मच्छीमार सोसायटीचा आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर, उरणनजीक असलेल्या धोकादायक कासा खडकानजीक वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे या परिसरात सुरक्षा व्यवस्था उभाण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

गेल्या दोन महिन्यांपासून बंदी असलेल्या समुद्रातील खोल मासेमारीला १ ऑगस्टपासून सुरुवात झाली आहे. त्यातच, गेल्या काही दिवसांपूर्वी उरण तालुक्यातील करंजा येथील ‘तुळजाई’ या मच्छीमार बोटीचा अपघात झाला होता. यामुळे, बोटीवरील तीन तरुण खलाशांचा मृत्यू झाल्याने कुटुंबीयांचा ‘आधार’ हरपला होता. यामुळे, करंजा येथील मच्छीमार सोसायटीमार्फत या कुटुंबियांना आर्थिक मदतीचा हात देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यामध्ये, राज्यातील सर्वात मोठी असलेल्या करंजा मच्छीमार सोसायटीमध्ये सुमारे ३५० मच्छीमार बोटींची नोंद असून या मच्छीमार सोसायटीमार्फत खलाशी आणि मासेमारी बोटीचा विमा काढण्यात येत असल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे, या सोसायटीमार्फत प्रत्येक मृत खलाशाला किमान तीन लाख रुपयांची आर्थिक मदत करण्यात येत असून अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना रोख रक्कम देण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचे सोसायटीचे अध्यक्ष प्रदीप नाखवा यांनी सांगितले आहे. तर, अपघातग्रस्त ‘तुळजाई’ बोटीसाठी सुमारे ७ लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

यामुळे, येत्या आठवडाभरात आपटा येथील नरेश शेलार, मुकेश पाटील आणि करंजा येथील धीरज कोळी यांना आर्थिक मदतीचा हा हात  देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. दरम्यान, उरणनजीकच्या करंजा खाडीत असलेला ‘कासा’ खडकालगत अनेक अपघात झाले आहेत. यामध्ये, १९४७ साली झालेल्या ‘रामदास’ बोटीच्या सर्वात मोठ्या अपघातात शेकडो प्रवाशांचा बळी गेला होता. त्यातच, करंजा बंदरात नव्याने सुरू झालेल्या ‘फिशिंग – डॉक’मुळे अनेक बोटींची वर्दळ वाढली आहे. यामुळे, शासनाने या धोकादायक असलेल्या ‘कासा’ खडकालगत सुरक्षा उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे करंजा मच्छीमार  या संदर्भात सोसायटीमार्फत शासनाकडे पत्र व्यवहार करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.