एकीकडे महागाई वाढते आहे. तर दुसरीकडे बँकांच्या ठेवींचे दर कमी होत आहेत. अशा वेळी भविष्यातील तरतूद म्हणून कोणता मार्ग किती प्रमाणात अंगीकारावा? त्यासाठीचे आर्थिक नियोजन कसे करावे, याबाबतचे मार्गदर्शन ‘लोकसत्ता अर्थभान’च्या मंचावर उपलब्ध झाले आहे.

यानिमित्ताने येत्या रविवार, १७ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईत तज्ज्ञ अर्थ नियोजनकारांचे गुंतवणूक मार्गदर्शन होत आहे. ‘आदित्य बिर्ला सन लाइफ म्युच्युअल फंड’ प्रस्तुत हा गुंतवणूकपर मार्गदर्शन उपक्रम सायंकाळी ६ वाजता साहित्य संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई येथे होईल.

उत्पन्न व खर्च यांची सांगड घालतानाच भविष्यातील आर्थिक तरतुदीविषयी काय धोरणे असावीत; वयाच्या कोणत्या टप्प्यात आर्थिक नियोजन कसे असावे, याबाबतचे मार्गदर्शन अर्थशास्त्राचे प्राध्यापक कौस्तुभ जोशी हे करतील. आर्थिक नियोजनाशी संबंधित सध्याची स्थिती, कुटुंबाचा खर्च व उद्दिष्टे यावरही ते या वेळी प्रकाश टाकतील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

म्युच्युअल फंड माध्यमातून गुंतवणूक व परताव्याचे ध्येय कसे साधता येईल याबाबत आर्थिक सल्लागार तृप्ती राणे मार्गदर्शन करतील. अन्य पर्याय व फंड यांची गुंतवणूक, परतावा तसेच जोखमीबाबत तुलना करतानाच फंडांचे प्रकार, त्यांची वैशिष्टय़े आदींबाबत त्या सांगतील. ‘लोकसत्ता अर्थभान’च्या गुंतवणूकपर मार्गदर्शनपर उपक्रमासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य आहे. काही जागा निमंत्रितांकरिता राखीव आहेत. तज्ज्ञांमार्फत गुंतवणूकविषयक शंकांचे निरसन करून घेण्याची संधी मिळेल.

काय?

लोकसत्ता अर्थभान

कधी?

रविवार, १७ नोव्हेंबर २०१९, सायंकाळी ६ वाजता

कुठे?

मराठी साहित्य संस्कृती व कला मंडळ, साहित्य मंदिर, सेक्टर ६, वाशी, नवी मुंबई</p>

मार्गदर्शक व विषय

तृप्ती राणे

म्युच्युअल फंड आणि गुंतवणुकीचा मेळ

कौस्तुभ जोशी

अर्थनियोजन महत्त्वाचे