लोकसत्ता टीम

नवी मुंबई: वाशी येथील सिडको प्रदर्शनी केंद्रात भरविण्यात आलेल्या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागरिकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत असल्याचे येथील स्टॉल धारकांनी सांगिलते आहे. दि.८मार्च डिसेंबर ते १९ मार्च २०२३ या कालावधीत आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत होणारे हे प्रदर्शन नवी मुंबईत पहिल्यांदाच भरविण्यात आले आहे. सुट्टीच्या दिवशी नागरिकांचा कल वाढत असून आतापर्यंत १ लाख ९३ हजार नागरिकांनी भेटी दिल्या आहेत. आतापर्यंत ३ कोटी २७ लाख रुपयांची उलाढाल झाल्याचे सांगण्यात येत आहे.

survey shows citizens have no confidence in food inspection agencies
खाद्यपदार्थांची तपासणी करणाऱ्या संस्थांच्या कार्यप्रणालीवर नागरिकांचा अविश्वास, सर्वेक्षणातून माहिती उघडकीस
Citizens object to concreting works at unnecessary places in navi mumbai
नको तेथे काँक्रीट रिते! अनावश्यक ठिकाणी काँक्रीटीकरणाच्या कामांना नागरिकांचा आक्षेप, शहरभर वाहतूककोंडी
Mumbai Swelters, Heatwave Grips, mumbai Citizens Advised, Take Precautions, summer in mumbai, heatwave in mumbai, precautions from sunstroke, sunstroke in mumbai,
उन्हाच्या तडाख्याने मुंबईकर हैराण
trangenders, beggars,
पुणे : नागरिकांना अडवून पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीय, भिक्षेकऱ्यांविरुद्ध खंडणीचे गुन्हे दाखल करा; पोलीस आयुक्तांचा आदेश

उमेद अभियानाअंतर्गत महिला बचतगटाच्या महिलांना त्यांच्या परिश्रमाला , व्यवसायाला या प्रदर्शनाच्या माध्यमातून एक व्यवयसायिक बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांचा खरीदार वर्ग वाढविण्यासाठी गेले १७ ते १८ वर्षांपासून हे महालक्ष्मी सरस प्रदर्शन आयोजित करण्यात येत आहे. या प्रदर्शनात हस्त कलेच्या वस्तू, भरतकाम केलेल्या साडया, ज्युटच्या वस्तू, बांबूच्या वस्तू, लाकडी वस्तू, लेदरच्या वस्तू, कृत्रिम दागिने, लेडीज बॅग, बुट, ड्रेस मटेरीयल, साडी, बेडशीट, कारपेट, पडदे तसेच घरगुती मसाले, पापड, कुरडई, इत्यादी वस्तू आणि जेवणाच्या मेजवानीचे स्टॉल उपलब्ध आहेत. प्रदर्शनामध्ये ५५० स्टॉल असून यामध्ये महाराष्ट्रातील ३५० आणि देशभरातून साधारण १५० स्टॉल आहेत.

आणखी वाचा- जगातले सर्वात महागडे कॉस्मेटिक हास्य आणि आनंद देण्याची ताकद कलावंतांमध्ये- सुधीर मुनगंटीवार

प्रदर्शनात राज्याच्या कानाकोपन्यातून आलेल्या सुगरणींचे खमंग आणि रुचकर शाकाहारी व मांसाहारी खाद्यपदार्थांचे ७० स्टॉल आहेत. या आधी हे प्रदर्शन बिकेसी येथे भरविण्यात येत होते. मात्र पहिल्यांदाच नवी मुंबई मध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे येथील काही स्टॉलधारकांनी त्यांच्या उत्पादनाचे ५० ते ७५ टक्के विक्री झाल्याचे समाधान व्यक्त करीत चांगला प्रतिसाद असल्याचे मत व्यक्त केले . तर दुसरीकडे काही स्टॉल धारकांनी नवी मुंबईपेक्षा मुंबईमध्ये होणाऱ्या प्रदर्शनाला जास्त चांगला प्रतिसाद असल्याचे मत व्यक्त केले. शनिवारी आणि रविवारी या सुट्टीच्या दिवशी नागरिकांच्या भेटी वाढत आहेत, त्यामुळे आता या शनिवारी आणि रविवारी नागरिकांचा कसा प्रतिसाद असेल तसेच उलाढालीत कितीने वाढ होईल हे पुढील कालावधीतच स्पष्ट होईल.

आमचा पापड,कुरडई, मसाले लोणचे या पदार्थांचा स्टॉल आहे . सुट्टीच्या दिवशी नागरिकांचा प्रतिसाद आहे. आत्तापर्यंत ५०% उत्पादनाचा खप झालेला आहे.
प्राजक्ता राजपूत, स्टॉल धारक

कागदापासून बनवलेले विविध शोभेच्या वस्तू तयार केल्या जातात त्यावर विविध रंगाम करून आकर्षित बनवले जाते. जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणावर आमचा व्यवसाय होतो. या प्रदर्शनात पहिल्यांदाच आम्ही सहभाग घेतला असून आत्तापर्यंत आमच्या मालाची ७५ टक्के विक्री झाली आहे. नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे.
हुमायरा लोने, जम्मू आणि काश्मीर, स्टॉल धारक

या महालक्ष्मी सरस प्रदर्शनाला नागरिकांचा चांगला प्रतिसाद आहे. आतापर्यंत ३ कोटी २७ लाख रुपयांची उलाढाल झाली आहे. महिलांना उत्तम व्यवयसायिक व्यासपीठ उपलब्ध होत आहे. नवी मुंबईत हे प्रथमच आयोजित करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने नागरिकांचा प्रतिसाद उत्तम आहे. महिला आणि व्यापारी , मोठे दुकान धारक यांच्यामध्ये १३ करार झाले आहेत. यामध्ये तांदूळ, हळद, मिरची पावडर यांचा समावेश आहे.
कुमार खेडकर, राज्य अभियान व्यवस्थापक