नवी मुंबई: बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबईतील महिलांसह होळी व धुलीवंदनाचा सण सीबीडी-बेलापूर येथे साजरा केला. यावेळी राजस्थान महाराष्ट्र गुजराती यांच्या सह महाराष्ट्रातील खास आगरी वेष परिधान करीत रंगपंचमी साजरी केली गेली. विशेष म्हणजे यावेळी पारंपरिक आगरी कोळी गाण्यासह बँड पथक, पंजाबी ढोल त्यात राजस्थानी, बंजारा गाण्यांचा तडका अशी संगीत मेजवानी एका पाठोपाठ एक साजरी होत होती.

त्यात सर्वांनी ठेका घेत नृत्य केलेच त्या नृत्यात आमदार म्हात्रे यांनीही सहभाग घेत आनंद लुटला. यावेळी लहान मुलींपासून ९० वर्षाच्या आजींनीही रंगांची उधळण करीत एक दिवस अगोदरच जोरदार रंगपंचमी साजरी केली. हिंदू सणांपैकी प्रमुख असलेला हा होळीचा सण दरवर्षी अत्यंत उत्साहात साजरा केला जातो. यावेळी भाजपा युवती प्रमुख सुहासिनी नायडू, अश्विनी घंगाळे, लाजवंती भोसले, ममता सिंग तसेच शेकडो महिला उपस्थित होत्या.

हेही वाचा >>> तुर्भेतुन तब्बल २३८५ किलो प्लास्टिक साठा जप्त, एकल प्लास्टिक वापरावर कडक कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी आमदार मंदा म्हात्रे यांनी सांगितले की, सालाबादप्रमाणे यावर्षीही होळी व धुलीवंदनाचा सण साजरा केला जात आहे. कोवीड काळात महाभयंकर परिस्थिती असल्याकारणाने हा सण साजरा करण्यात आला नव्हता. परंतु बंजारा समाज, राजस्थानी लोकगीते, कोळी बँड च्या धुमधडाक्यात रंगांची उधळण करत हा सण आज साजरा करण्यात आलेला आहे. होळी हा रंगांचा सण आहे परंतु सावधानता पाळणे अधिक गरजेचे आहे. असे सांगत त्यांनी रासायनिक रंग न वापरण्याचे आणि फुग्यांचा वापर न करण्याचे आवाहन केले. तसेच कोणाची इच्छा नसेल तर उगाच जबरदस्ती रंग लावू नये. अशी सूचनाही केली.