डहाणू: धामणी धरणातून मिराभाईंदर आणि वसई महानगर पालिकेला पाणी वाहुन नेण्यासाठी मुंबई-अहमदाबाद महामार्गालगत खोदकामात निघालेले दगड आणि माती महामार्गालगत पसरण्यात येत आहे. त्यामुळे सेवा रस्ते तसेच महामार्गालगत वाहतूक करताना वाहतुकीस धोका निर्माण होत आहे. मस्तनाका, दुर्वेस, हलोली, बोट या भागात वाहतूकदारांना त्रास सहन करावा लागत आहे.त्यामुळे हे. माती ढिगारे दूर करण्याची मागणी वाहतूकदार करत आहेत.

मुंबई अहमदाबाद महामार्गालगत एमएमआरडीएच्या सुरु असलेल्या जलवितरिकांच्या खोदकामामुळे इतस्त: पडलेल्या दगडाच्या ढिगाऱ्यावर अवजड वाहनांची धडक लागून अपघात घडत आहेत. काम झालेल्या भागातील दगड मातीचे ढिगारे तातडीने दूर करुन महामार्गावरील अडथळे दुर करण्याची मागणी वाहतुकदार करीत आहेत. त्यालगत बॅरिगेटर लावून वाहतुकदारांना कामाबाबत सूचना दिल्या जात आहेत. तर अनेक भागात हे सूचना फलक दिसत नाहीत.

एमएमआरडीएच्या कामामुळे ठिकठिकाणी दगडाचे ढिगारे पडले आहेत. नजरचुकीने अपघाताची दाट शक्यता आहे.वाहतुकदारांनाना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संदेश गणेशकर, वाहन चालक