दिघा परिसरातील रामनगर येथे राहणाऱ्या एका तरुणाने त्याच परिसरात राहणाऱ्या १२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली आहे. दीपक तायडे असे या आरोपीचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात विनयभंगाची तक्रार करणारी १२ वर्षीय तरुणी दिघा येथील रामनगरमध्ये राहते. शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास ही मुलगी घरी जात असताना दीपकने तिचा विनयभंग केला. या मुलीने घडल्या प्रकाराची माहिती आपल्या आईला दिली. यानंतर तिच्या आईने पोलीस ठाणे गाठून दीपकविरोधात तक्रार केली.