नवी मुंबई : दांडीया खेळण्यास मज्जाव केल्याचा राग मनात ठेवत त्याच रात्री त्या युवकाने हातोड्याने डोक्यावर, अंगावर घाव घातले. यात तीन जण जखमी असून त्यातील एकाचा उपचार दरम्यान मृत्यू झाला आहे. आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. यातील आरोपीचे नाव जितेंद्र बाबूलाल पटवा  असे आहे. तर आकाश जैस्वाल असे मयत झालेल्या युवकाचे नाव आहे. रशीद मुबारक आणि अभिषेक भालेराव असे जखमींचे नाव आहेत. हि घटना रबाळे एमआयडीसी भागातील साईनगर परिसरात घडली आहे. फिर्यादी आरोपी व जखमी हे सर्व याच परिसरात राहणारे आहेत, व एकमेकांना ओळखणारे आहेत. २६ तारखेला गरबा खेळत असताना आरोपी हा वेडेवाकडे नाचत होता.

हेही वाचा >>> पनवेल : तरुणीचा विनयभंग करुन डीलेव्हरीबॉयचे पलायन

thief ATM Kalyan, ATM Kalyan,
तब्बल ९२ एटीएम कार्डद्वारे डल्ला मारणाऱ्या चोराला कल्याणमध्ये अटक, आधीच १६ गुन्हे दाखल असल्याचंही उघड
Solapur Murder wife, Solapur, Murder second wife,
सोलापूर : तीन घरांच्या दादल्यात आर्थिक कारणांवरून दुसऱ्या पत्नीचा खून, रक्ताने माखलेल्या चाकूसह पती पोलिसांत हजर
Police raid on Dancers obscene dance in bungalow at lonawala
लोणावळा: बंगल्यात सुरू होता नृत्यांगनाचा अश्लील नाच; पोलिसांनी टाकला छापा
Young Woman, Dream of Joining, Police Force, False Theft Accusation, Forced into Prostitution, Dashed, police, nagpur, nagpur news, marathi news,
पोलिस खात्यात नोकरीसाठी, निवड, पण तिच्या नशिबी वेगळेच काही होते

दुर्गादेवी समोर असला नाच न करण्याचे अनेकदा त्याला सांगण्यात आले तरीही दांडिया न खेळता वेडवाकडे नृत्य करत असल्याने त्याला मंडपातून बाहेर काढण्यात आले. हाच राग मनात ठेवत आरोपीने दांडिया संपल्या नंतर मंडपात झोपलेल्या फिर्यादी व इतरांना हातोडीने मारहाण केली. यावेळी त्याने शिवीगाळ करीत दांडीया का खेळू देत नाही म्हणून आरडाओरडा केला. या प्रकाराने गोंधळ उडाला होता. हे कळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी तातडीने पोलीस पथक पाठवले, आसपासच्या लोकांनी पोलिसांच्या मदतीने जखमींना जिजामाता रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारा दरम्यान आकाश याचा मृत्यू मंगळवारी झाला. दरम्यान घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी आरोपीस ताब्यात घेतले होते. हि माहिती मिळताच स्वतः पोलीस उपायुक्त विवेक पानसरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस निरीक्षक रमेश जाधव सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन कुंभार व पथकाने भेट दिली.   मंगळवारी संध्याकाळी त्याला अटक करण्यात आली आहे.  अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिली.