शहराकडून नवी मुंबई शहराकडे जाणाऱ्या एन एम एम टी बस व वँगनर या दोन वाहनांचा अपघात झाल्याची घटना घडली आहे. करळ पुलावर गुरुवारी हा अपघात झाला. या अपघातात वँगनर गाडीचा चालक जखमी झाला आहे.

हेही वाचा- पनवेल : सीवूड्स रेल्वे स्थानकाचे नाव मोठे लक्षण खोटे; सुविधांच्या अपुरततेमुळे प्रवाशांचे हाल

अपघातात एक जण जखमी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार उरण शहरातून नवी मुंबई शहराकडे जाणाऱ्या एन.एम.एम.टी. या प्रवाशी बसला करळ उड्डाणपूलावरुन विरुद्ध दिशेने येणाऱ्या वँगनर गाडीने समोरासमोर धडक दिली. सदर अपघातात वँगनर गाडीचा चालक जखमी झाला आहे. या अपघाताची माहिती मिळताच न्हावा शेवा वाहतूक पोलीस यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांनी तसेच न्हावा शेवा पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटना स्थळी धाव घेऊन जखमी चालकास तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघाता संदर्भात न्हावा शेवा पोलीस ठाण्यातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर भटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी अधिक तपास करीत आहेत.