२५ सप्टेंबरला माथाडी कामगार नेते स्व. अण्णासाहेब पाटील जयंती निमित्त नवी मुंबई एपीएमसी मध्ये भव्य कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. याला राज्यातील प्रमुख नेते आवर्जून हजेरी लावतात. मात्र आजच्या मेळाव्याला मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री अजित पवार उद्योग मंत्री उदय सामंत, कृषी मंत्री अब्दुल सत्तार कामगार मंत्री सुरेश खाडे एवढ्या प्रमुख नेत्यांनी दांडी मारली होती. या बाबत माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी आपल्या भाषणात नाराजी व्यक्त केली. 

हेही वाचा >>> स्वातंत्र्य संग्रामात झालेल्या चिरनेर जंगल सत्याग्रहातील हुतात्म्यांना अभिवादन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यावेळी पाटील यांनी खंत व्यक्त करीत सांगितले की सध्या गणेश उत्सव असल्याने मंडळांना भेटी द्यावे लागत असेल मात्र या मेळाव्याची वेळ मी सुमारे एकत्व दिड महिन्यांपूर्वी घेतली असून ते आले नाहीत. मेळाव्यात तुम्हाला ऐकण्यासाठी तुमचे मार्गदर्शन घेण्यासाठी लातूर, नाशिक, पुणे, कोल्हापूर अशा विविध भागातून येत असतात. हे लक्षात घेणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.  मात्र उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले, गणेश नाईक, मंदा म्हात्रे , मुंबई बँक अध्यक्ष प्रवीण दरेकर आदींनी उपस्थिती दाखवल्याने आभार व्यक्त करण्यात आले