विमानतळ उभारणीसाठी आवश्यक असलेली प्रमुख कामे मार्गी लागल्यानंतर सिडकोने आजूबाजू्च्या पायाभूत सुविधा आणि चार पंचतारांकित हॉटेलांचा प्रस्ताव तयार करण्यास घेतला आहे. यापूर्वी याच परिसरात एबीआयएल कंपनीने ३० हजार चौरस मीटर क्षेत्रफळाचा भूखंड पंचतारांकित हॉटेलसाठी विकत घेतला होता पण विमानतळाच्या कामांना वेळीच सुरुवात न झाल्याने त्यांनी हा भूखंड निवासी वापर बदल करून घेतल्याने हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. भविष्यात विमानतळाची प्रवासी संख्या पाहता या ठिकाणी चार-पाच पंचतारांकित हॉटेल्सची आवश्यकता आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नवी मुंबई विमानतळाच्या मुख्य गाभा क्षेत्राचे १६ हजार कोटी रुपये खर्चाचे काम जी. व्ही. के. बांधकाम कंपनीला प्राप्त झाले असून त्यांच्या निविदेवर राज्य सरकाराने मोहर उमटवली आहे. पुढील वर्षी या कंपनीला प्रकल्पासाठी वित्तपुरवठा करणारी वित्तसंस्था मिळाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी दोन हजार कोटी रुपये खर्चाच्या विमानतळपूर्व कामांना जोरात सुरुवात झाली आहे. विमानतळाचा दोन हजार हेक्टरचा परिसर हा पायाभूत सुविधांपासून दूर आहे. त्यामुळे या ठिकाणी रस्ते, पाणी, गटार, वीज या सुविधांची तरतूद करावी लागणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai international airport five star hotel
First published on: 21-12-2017 at 01:02 IST