नवी मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव देण्याचा प्रस्ताव अंतिम केला आहे. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे विचाराधीन आहे. अनेकांच्या मनात याविषयी वेगवेगळ्या शंका असल्या, तरी दि. बा. पाटील यांच्या कुटुंबीयांच्या मनात याविषयी अजिबात शंका नसून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की देतील असा विश्वास दि. बा. पाटील यांचे सुपुत्र अतुल पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

आणखी वाचा-लोकल सेवेच्या उद्घाटनाची उरण स्थानकात जोरदार तयारी सुरू, फुलांच्या माळांनी स्थानक सजलं

शिवडी- न्हावा शेवा ‘अटल सेतू’ ज्या ठिकाणी उभा आहे याठिकाणची नवी मुंबईकडील बाजूस असलेली जागा ही दि. बा. पाटील यांच्या कुटुंबीयांची होती. सिडकोच्या अधिग्रणात ती जागा संपादित झाली असेही अतुल पाटील यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव आजच जाहीर करतील असा मला विश्वास आहे असंही अतुल यांनी सांगितलं. येत्या काही दिवसात केंद्रीय मंत्री सिंधीया हे देखील नवी मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. नवी मुंबई विमानतळाच्या कामाची ते पाहणी करणार आहेत. या पाहणी दरम्यान ते देखील या नावावर शिक्कामोर्तब करतील असेही अतुल पाटील म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.