मोठं मोठ्या टक्केवारीचे आमिष दाखवून कोणी गुंतवणूक करत असाल तर सावधान असावे त्यांच्या आमिषाला बळी पडू शकतात. अशाच प्रकारे गुंतवणुकीवर ३० ते ५० टक्के परताव्याचे आमिष दाखवून नवी मुंबईतील एका व्यक्तीची तब्बल १८ लाख ९० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे यातील फिर्यादी व आरोपी एकदाही आमने सामने भेटले नाहीत. नवी मुंबईत राहणारे कपिल शहा यांना ७ डिसेंबर रोजी व्हाट्स अप वर एक संदेश आला. त्यानुसार गुंतवणुकीचे चांगली संधी असून एका दिवसातच ३० ते ५० टक्के परतवा मिळू शकतो असे आमिष दाखवण्यात आले होते. त्यासाठी टेलिग्राम ऍप मोबाईल मध्ये लोड करून त्या लिंक वरून गुतंवणूक करावी लागते असे सांगण्यात आले होते. शहा यांनी मोबाईल वर बोलणाऱ्या व्यक्तीने सांगितल्या प्रमाणे करत गेले. यात त्यांनी स्वतःचा इ मेल आयडी दिला तसेच क्रिप्टोग्लोब वर शहा यांचे खाते बनवण्यात आले. त्याची लिंक शहा यांना पाठवण्यात आली.

हेही वाचा >>> आयओटीएल विरोधात धुतुम ग्रामस्थांचे प्रवेशद्वार बंद आंदोलन; नोकरी देण्याच्या आश्वासनाची अंमलबजावणी करण्याची मागणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

फोनवर बोलणाऱ्या व्यक्तीने स्वतःचे नाव कौशिकी शुक्ला असे सांगितले होते दुसऱ्या दिवशी शहा यांनी २ हजार रुपये त्याच्या खात्यात गुगल पे द्वारे टाकले. त्याच दिवशी या दोन हजार रुपयांचा परतावा म्हणून २ हजार ८०० रुपये शहा यांच्या खात्यात जमा झाले. त्यानंतर हे खाते मोहन कुमार यांच्या द्वारा चालवले जाईल असे शुक्ला याने सांगितले . त्याने सांगितल्या प्रमाणे शहा यांनी १ लाख ५० हजार भरले. मोठ्या परताव्याची अपेक्षा असताना मुद्दल आणि परतावा हवा असेल तर ५ लाख चाळीस हजार भरण्यास सांगितले. दुर्दैवणारे शहा यांनी तेही पैसे भरले. धक्कादायक म्हणजे त्या नंतर एकूण रकमेवर मोठा परतावा मिळेल पण १२ लाख भरावे लागतील असे फोनवरील व्यक्तीने सांगितल्यावर तीही रक्कम शहा यांनी भरली. अशाच प्रकारे शहा यांनी एकूण १८ लाख ९० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.  मात्र तरीही परतवा दूरच पण २८ लाख रुपयांची मागणी केली गेली. तेव्हा मात्र हि रक्कम भरणे शक्य नाही मला माझे निदान मुद्दल तरी परत द्या अशी विनंती शहा यांनी मोबाईल वर बोलणाऱ्या व्यक्तीला केली. अशी विनंती केल्यावर मात्र पुढां कधी संपर्क झालाच नाही त्यामुळे आपली फसवणूक झाल्याची खात्री शहा यांना झाली,  आणि त्यांनी सायबर पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून तीन अनोळखी लोकांवर आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला.