नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील मालमत्ताधारकांना महानगरपालिकेच्या डिजिटल सेवा अधिक सुलभ व प्रभावीपणे वापरता याव्यात यादृष्टीने ‘केवायसी’ प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करण्याचे आवाहन नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.नवी मुंबई महानगरपालिकेच्या मालमत्ताकराशी संबंधित विविध सेवा आणि सुविधा आता ऑनलाइन स्वरूपात उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यामुळे नागरिकांना घरबसल्या आपल्या मोबाईलवरही मालमत्ताकर बिल पाहता येणार आहे तसेच त्याचा भरणा करता येणार आहे. त्याचप्रमाणे महापालिकेशी संबंधित विविध माहिती जसे की, महत्त्वाच्या सूचना, पाणीपुरवठा, अतिवृष्टीचा इशारा, वाहतूक कोंडी या संबंधीचे इमर्जन्सी अलर्ट त्वरित मिळू शकतील.

मालमत्तेला केवायसी जोडताना मालमत्ता धारकाचा मालमत्ता क्रमांक, मोबाईल नंबर, ईमेल आयडी इत्यादी तपशील भरावे लागतील. ही माहिती पूर्ण आणि अचूक भरल्यानंतर संबंधित खात्यातून एसएमएस व इमेल द्वारे मालमत्ताकराची बिले, करभरणा करण्यासाठी लिंक तसेच संबंधित विभागाचे अपडेट्स मिळतील. सुलभ रितीने मालमत्ताकर भरणा करता यावा यासाठी नवी मुंबई महानगरपालिकेने विविध ऑनलाइन माध्यमे उपलब्ध करून दिली असून त्यासाठी आवश्यक डिजिटल प्रक्रिया पार पाडणे हा आपल्या जबाबदारीचा भाग आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संकेतस्थळावर क्यूआर कोड

मालमत्ताकर विभागाच्या डिजिटल सेवेचा पूर्ण लाभ घेण्यासाठी ‘केवायसी – आपले ग्राहक ओळखा’ ही प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यासाठी https://www.nmmc.gov.in या संकेतस्थळावर जाऊन क्यूआर कोड स्कॅन करून किंवा संबंधित लिंकवर क्लिक करून केवायसी प्रक्रिया पूर्ण करता येईल.