नवी मुंबई – नवी मुंबई महापालिकेत पालिका आस्थापनेवरील गट-क व गट- ड मधील विविध संवर्गातील ६६८ रिक्त पदे सरळसेवा भरती प्रक्रियेद्वारे भरण्यात येणार आहेत. या भरतीसाठी १,३४,४०४जनांनी नोंदणी केली होती परंतू अखेरच्या दिवसापर्यंत त्यातील ८४,७७४ जनांनीच परिक्षा शुल्क भरले आहे. त्यामुळे आता पालिकेच्या ६६८ पदांसाठी ८४,७७४जन रिंगणात आहेत.त्यांची ऑनलाईन परीक्षा होणार असून त्यातूनच ६६८ जनांची निवड केली जाणार आहे. ऑनलाईन परीक्षेबाबत लवकरच पालिकेकडून सविस्तर माहिती दिली जाणार आहे.

नवी मुंबई महापालिकेत ६६८ जागांसाठी अर्ज करण्याची मुदत ११ मे ऐवजी १९ मे करण्यात आली होती. पालिका इतिहासातील ही सर्वात मोठी भरती असून पालिकेतील विविध पदासाठी भरती होत असून भरतीप्रक्रियेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत २८ मार्च पासून सुरू करण्यात आली होती. भरतीसाठीच्या ऑनलाईन नोंदणीला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. नवी मुंबई महापालिकेत २००८ नंतर प्रथमच सर्वात मोठी भरती केली जाणार असून अत्यंत पारदर्शक पध्दतीने ही भरती प्रक्रिया राबवण्यात येणार असल्याची माहिती पालिका प्रशासनाने लोकसत्ताला दिली आहे. भरतीमध्ये ६६८ कायम जागांसाठी पालिकेत ही भरती होणार आहे.

नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या या भरतीमध्ये विविध ६६८ जागांसाठीच्या भरतीमध्ये लिपीक- टंकलेखक,लेखा लिपिक तसेच स्टाफ नर्स व मिडवाईफ नर्स,कनिष्ठ अभियंता,आया, वॉर्डबॉय या पदांसाठी सर्वाधिक जागा आहेत. पालिकेमार्फत होणाऱ्या या भरती प्रक्रियेत बायोमेडिकल इंजिनिअर,कनिष्ठ अभियंता, उद्यान अधिक्षक,उद्यान सहाय्यक, सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी,वैदकीय समाजसेवक, डेंटल हायजनिस्ट,डायलिसिस तज्ञ सांख्यिकी सहाय्यक इसिजी तंत्रज्ञ,सेन्ट्रल सर्जिकल सुपरवायजर,आहार तंत्रज्ञ,नेत्र चिकित्सा सहाय्यक ,औषध निर्माता अधिकारी,आरोग्य सहाय्यक (महिला),ऑक्झिलरी नर्स मिडवाईफ,सहाय्यक ग्रंथपाल अशा विविध ३० प्रकारच्या पदांसाठी भरती प्रक्रिया होणार आहे. या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षेसाठी खुल्या प्रवर्गासाठी १,००० रुपये तर अनाथ व मागासवर्गासाठी ९०० रुपये परीक्षा फी आकारण्यात आली आहे. पालिकेच्या भरतीसाठी अखेरच्या दिवसापर्यंत १,३४,४०४ जनांनी ऑनलाईन नोंदणी केली होती.परंतू त्यातील ८४, ७७४ जनांनीच परीक्षाशुल्क भरल्यामुळे ६६८ जागांसाठी ८४७७४ जनांमधूनच परीक्षेनंतर सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांची अंतिम निवड केली जाणार आहे. या भरती प्रक्रियेसाठी सर्वाधिक ऑनलाईन अर्ज हे लिपीक व टंकलेखक पदासाठी प्राप्त झाले आहेत.

कोणत्या पदांसाठी किती अर्ज प्राप्त ….

१३५- लिपीक व टंकलेखक – २३,३४७ अर्ज

५१- बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी – १५,४४७ अर्ज

८३- कनिष्ठ अभियंता- १४,५५८ अर्ज

१३१- स्टाफ नर्स व मिडवाईफ- १२,६३४ अर्ज

पालिकेतील ६६८ जागांसाठीच्या भरतीला मोठा प्रतिसाद मिळाला असून ८४७७४ जनांनी ऑनलाईन परीक्षा शुल्क भरले आहे. त्यांचीच ऑनलाईन परिक्षा घेतली जाणार आहे. परिक्षेसंदर्भात आवश्यक ती माहिती तसेच परीक्षा केंद्र याबाबतची माहितीही दिली जाणार आहे. महाराष्ट्रात एकाचवेळी ऑनलाईन परीक्षा होणार असून त्याचे परीक्षा केंद्र यांचीही ऑनलाईन माहिती लवकरच दिली जाणार आहे. याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे.

शरद पवार, उपायुक्त प्रशासन विभाग

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई महापालिकेत होणाऱ्या भरतीबाबतची परीक्षा व परिक्षा केंद्र यांची सर्व माहिती नवी मुंबई महापालिकेच्या – WWW.nmmc.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन दिली जाणार आहे. तसेच दिशाभूल करणाऱ्या माहितीला बळी पडू नये अथवा अफवांवर विश्वास ठेऊ नये असे आवाहन पालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले आहे.