महापालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्षही सज्ज

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संतोष जाधव

नवी मुंबईत प्रवेश करणाऱ्या प्रत्येकावर व शहरातील सार्वजनिक ठिकाणच्या हालचालींवर १६०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार असून नवी मुंबई महापालिकेत बहुचर्चित असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे काम दृष्टीक्षेपात आले आहे.पालिका मुख्यालयात पहिल्या मजल्यावरील नियंत्रण कक्षाचे कामही अंतिम पूर्ण करण्यात आले असून बेलापूर विभागापासून सीसीटिव्ही कॅमेरे लावण्यास सुरवात झाली आहे.

हेही वाचा >>>नवी मुबंई: बाईक कार रॅलीद्वारे कर्करोगाची जनजागृती

त्यामुळे लवकरच शहरावर व सार्वजनिक ठिकाणच्या बारीक हालचालीवर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार असून नवी मुंबईकरांच्या सुरक्षितेमध्ये अधिक वाढ होणार आहे. शहरात पोलीसांबरोबर सर्वेक्षण पूर्ण करुन सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची ठिकाणे निश्चित करण्यात आली आहेत. बेलापूर विभागात कॅमेरे लावण्यास सुरवात झाली आहे.पुढील काही महिन्यात संपूर्ण शहर १६०५ सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या नजरेत येणार आहे. नवी मुंबई महापालिकेच्या हद्दीत नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी संपूर्ण शहरावर तिसऱ्या डोळ्याची नजर राहणार आहे. मेसर्स टाटा अँडव्हान्स सिस्टम लिमिटेड यांच्याकडून शहरात वेगात कामाला सुरवात झाली असून पुढील दोन महिन्यातच हे काम पूर्ण करण्याचा पालिकेचा व ठेकेदाराचा प्रयत्न आहे.ठेकेदाराला मार्चपर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत दिली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून सध्या शहरातील २८२ ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत.परंतू शहरातील सर्वच विभागात महत्वाच्या ठिकाणी नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने महापालिका जवळजवळ १४८ कोटी रुपये खर्चातून अत्याधुनिक पध्दतीने शहर तिसऱ्या डोळ्याच्या नजरेत आणणार आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने महापालिका व्याप्त हद्दीतील महत्वाची निवडक ठिकाणे,नवी मुंबई शहरातील प्रवेशद्वारे,मुख्य चौक,मार्केट, बस डेपो,रेल्वेस्थानकाबाहेरील परिसर तसेच शहरातील वर्दळीच्या ठिकाणी देखरेखीसाठी शहरातील मुख्य रस्ते याठिकाणी पालिकेने २०१२ रोजी २८२ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले होते. परंतू आयटी उपकरणे यांचे आयुर्मान ५ वर्ष निश्चित करण्यात आले आहेत.त्यामुळे शहरात १६०५ अत्याधुनिक नवीन कॅमेरे बसविण्यात येत आहेत.याबाबतचा प्रस्ताव मागील अनेक वर्षापासून लालाफितीत व दरांवरुन अडखळत पडला होता. परंतू तत्नकालिन पालिका आयुक्त यांच्या काळात या कामाला कार्यादेश मिळाला त्यामुळे आता आयुक्त नार्वेकर यांच्या कार्यकाळात हे काम प्रत्यक्षात येणार आहे. मुंबई शहरात प्रवेश करण्यात येणाऱ्या ऐरोली मुलुंड उड्डाणपुल,ठाणे दिघा रोड,शिळफाटा जंक्शन,वाशी टोल नाका,बेलापूर किल्ले गावठाण व बेलपाडा अशा सर्वच प्रवेशद्वारावर तसेच वाहतूक नियंत्रणासाठी कॅमेरे लावण्यात येत आहेत.

हेही वाचा >>>नवी मुंबई : अल्पवयीन मतिमंद मुलीचे अपहरण करून बलात्कार, दोन आरोपींना अटक

शहरासाठी महत्वाच्या असलेल्या कामात शहराच्या प्रत्येक प्रवेश निर्गमन जागेवर हाय डेफिनेशन फिक्स व हायस्पीड कॅमेरे लावण्यात येणार आहेत.तसेच शहरात येणाऱ्या वाहनाबाबतची माहिती ठेवण्यासाठी स्वयंचलित पध्दतीने नंबर प्लेट् वाचण्यासाठी एएनपीआर कॅमेरे बसविण्यात येत आहेत.तसेच शहरातील २७ मुख्य चौकांसाठी १०८ कॅमेरे बसविण्यात येत आहेत.त्याचप्रमाणे सर्व बसडेपो ,मार्केट,उद्याने,मैदाने,पालिका कार्यालये,वर्दळीची ठिकाणे,चौक ,नाके,मर्मस्थळे ही सर्व सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या कक्षेत येणार आहेत.तसेच शहरातील वर्दळीचे पामबीच मार्ग ,ठाणे बेलापूर रोड, पालिका हद्दीतील सायन पनवेल रोड येथे हायस्पिड कॅमेरे लावण्यात येणार आहेत.त्याचप्रमाणे शहरातील ४३ ठिकाणी पॅनिक अलार्म व कॉलबॉक्सची सोय असणार आहे.त्याचप्रमाणे नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या मागणीनुसार देशविघातक व घातपात कृत्यावर लक्ष ठेवण्यासाठी खाडी व समुद्र किनारे अशा ९ ठिकाणी थर्मल कॅमेरे बसविण्यात येणार आहेत.त्याचबरोबर ८ ठिकाणी स्थानिक नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात येणार आहेत.तसेच नवी मुंबई महापालिका मुख्यालय केंद्रिय नियंत्रण कक्ष पोलीस आयुक्तालय यांच्याशी जोडण्यात येणार आहे.तसेच या कामाचा डेटा सेंटर पोलीस मुख्यालय असेल तसेच ते पालिकेकडेही पहिल्या मजल्यावर तयार करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षात असणार आहे. पालिकेच्या प्रत्येक विभाग कार्यालय किंवा जवळच्या पोलीस स्टेशनमध्ये विभागीय चित्रीकरण असणार आहे. त्यामुळे एखाद्या विभागात घटना घडली तर ती नजीकच्या पोलीस स्थानकातही पाहता येणार आहे.रेड लाईट व्हायलेन्सनम्हणजेच सिग्नल तोडणाऱ्या वाहनचालकांच्यावर नजर ठेवण्यासाठी देखरेखीसाठी ९६कॅमेरे असणार आहेत.त्यामुळे नागरीकांनाही वाहतूक नियमांच्या शिस्तीचे पालन करावे लागणार आहेत. सीसीटीव्हीच्या १५४ कोटीच्याकामासाठी २७४ कोटीची निविदा आधी आली होती.त्यामुळे पालिका तत्कालीन आयुक्त बांगर यांनी ती निविदा प्रक्रियाच रद्द करुन नव्याने या कामासाठी निविदा मागवली होती. त्यामध्ये वजा ७.०४ कमी दराने निविदा स्विकृती केल्यामुळे पालिकेचा अंदाजे २० कोटीपेक्षा अधिक फायदा होणार आहे.संबंधित ठेकेदाराला ९ महिन्याची कामाची मुदत देण्यात आली असून २१ नोव्हेंबर २०२२ पर्यंत काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली
होती.परंतू पावसाळ्त्यायाच्या काळात खोदकामाला परवानगी नसल्याने या कामाला मार्चपर्यंतची मुदत देण्यात आली आहे.त्यामुळे पुढील काही महिन्यातच संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न असल्याची माहिती लोकसत्ताला दिली.

हेही वाचा >>>वीजदरवाढ होणार, मात्र ‘जोर का झटका’ नाही; महावितरणने ३७ टक्के वीजदरवाढीचा प्रस्ताव दिल्याचे वृत्त चुकीचे

कोणते व किती कॅमेरे
हाय डेफिनेशन कॅमेरे-९५४
पीटीझेड कॅमेरे-१६५
वाहनांची गती देखरेख कॅमेरे-९६
पॅनिक अलार्म व कॉल बॉक्स सुविधा-४३ ठिकाणे
खाडी व समुद्र किनारे देखरेख थर्मल कॅमेरे-९
सार्वजनिक घोषणा ठिकाणे-१२६

नवी मुंबई शहरात जवळजवळ १६०५ सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात
येत असून संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे.सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण काम होणार आहे. पालिका मुख्यालयातील नियंत्रण कक्ष तयार करण्यात आले आहे.तसेच बेलापूर विभागात कॅमेरे लावण्यास सुरवात करण्यात आली असून १०० पेक्षा अधिक कॅमेरे लावण्यात आली आहे. संपूर्ण शहर सीसीटीव्हीच्या नजरेत येणार आहे.
शिरीष आरदवाड,सह शहर अभियंता

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Navi mumbai municipal corporation has started installing 1605 cctvs in the city amy
First published on: 29-01-2023 at 18:27 IST