कारवाईसाठी मुख्यमंत्र्यांना पत्र
पालिकेचे प्रशासन उपायुक्त डॉ. सुहास शिंदे यांची बुधवारी बदली झाल्याने कार्यकाळ संपलेल्या आणखी तीन अधिकाऱ्यांना त्यांच्या मूळ विभागात परत पाठविण्यात यावे, असे पत्र बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. यात अतिरिक्त आयुक्त अंकुश चव्हाण, मुख्य लेखा अधिकारी धनराज गरड आणि स्थानिक स्वराज्य संस्था कर उपायुक्त उमेश वाघ यांचा समावेश आहे. पालिकेत एकूण आठ अधिकारी प्रतिनियुक्तीवरील आहेत. त्यापैकी चार जणांचा कार्यकाळ अद्याप संपलेला नाही.
पालिकेतील काही प्रमुख पदांवर राज्य शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकारी पालिकेतील काही प्रमुख पदांवर राज्य शासनाने प्रतिनियुक्तीवर अधिकारी नियुक्त केले आहेत. त्यानियुक्त केले आहेत. त्यातील चार अधिकाऱ्यांचा कार्यकाळ संपलेला आहे. त्यांची तात्कळ बदली व्हावी, अशी मागणी बेलापूरच्या आमदार म्हात्रे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांनीही उचित कारवाई करण्याचे आदेश नगरविकास विभागाला दिले होते. त्यामुळे प्रशासन विभागाचे उपायुक्त सुहास शिंदे यांनी पालकमंत्र्याकडून अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवार यांच्याकडे बदली रद्द करूनही त्यांच्या बदलीचे बुधवारी आदेश जारी केले. यासाठी महापौर सुधाकर सोनावणे व शिवसेनेचे उपनेते विजय नाहटा यांनी खास प्रयत्न केले होते. मात्र यात आमदार म्हात्रे यांची सरशी झाली. त्यामुळे इतर तीन अधिकाऱ्यांची कधी बदली होणार याचे आडाखे पालिकेत बांधले जात आहेत.
अधिकाऱ्यांमध्ये शीतयुद्ध
अतिरिक्त आयुक्त चव्हाण यांच्या कामाची पद्धत चांगली आहे. माजी आयुक्त मुंढे यांच्या काळात त्यांच्या आदेशाचे तंतोतंत पालन चव्हाण यांनी केले होते. मात्र ताईंची त्यांच्यावरदेखील खफा मर्जी आहे. यामागे अधिकारी ऐकत नाहीत, ही एक तक्रार आहे. चव्हाण यांना मागील महिन्यातच पालिकेत दोन वर्षे झालेली आहेत. पालिकेत सध्या प्रतिनियुक्त अधिकारी विरुद्ध पालिकेचे कायम अधिकारी असे एक शीतयुद्ध सुरू आहे. त्याला या बदली सत्रामुळे खतपाणी मिळण्याची शक्यता आहे.