नवी मुंबई : करावे गावच्या तलावाशेजारीच विस्तीर्ण गणपतशेठ तांडेल मैदानालगतचा चौक वाहनांच्या वर्दळीमुळे व पाच रस्ते एकत्र आल्यामुळे धोकादायक असून येथे सातत्याने छोटे मोठे अपघात होतात. त्यामुळे चौकात वाहकूक बेट तयार करून काँक्रीटीकरण काम केले जात आहे.

हेही वाचा >>> पनवेलमधील शोरुममध्ये पावणेदोन लाखांची चोरी

या ठिकाणी सततच्या होणाऱ्या अपघातामुळे या चौकाबाबत नवी मुंबई महापालिकेने योग्य ती उपाययोजना करण्याची मागणी स्थानिक नागरिक तसेच या मैदानात जॉगिंगसाठी येणारे नागरीक यांनी सातत्याने केली होती. गणपतशेठ तांडेल चौकात करावे गाव व तलावाच्या दिशेने एक तसेच सीवूड्स डी मार्टच्या दिशेने तसेच सीवूड्स रेल्वेस्थानक दिशेने व पामबीच मार्गाने या चौकात एकत्र वाहने मोठ्या संख्येने येत असतात.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चौकात वाहतूक बेट व सिग्नल व्यवस्था नसल्याने सातत्याने अपघात होत आहेत. तसेच या चौकांच्या कोणत्याच मार्गावर गतिरोधकही नसल्याने दुचाकी तसेच चारचाकी वेगाने आल्याने अपघात घडतात. याच भागातून ज्वेल ऑफ नवी मुंबई परिसरात जाण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची संख्याही मोठी असते. त्यामुळे या भागात पालिकेने काँक्रीटीकरण तसेच वाहतूक बेट उभारणीच्या कामाला सुरुवात केली आहे. त्यासाठी २ कोटी ७७ लाख रुपयांचा खर्च केला जाणार आहे.