scorecardresearch

Premium

मुंबईतील समुद्राच्या पश्चिम किनारपट्टीच्या भूगर्भात भूकंपाच्या हादऱ्याने नवी मुंबई, पनवेल हादरले

मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात रविवारी सकाळी काही सेकंदासाठी झालेल्या भूकंपाच्या २.९ रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला.

Japan Tsunami warning issued after Earthquake
जपानमध्ये ७.६ रिश्टर स्केल भूकंपाचा धक्का

पनवेल : मुंबईच्या समुद्र किनारपट्टीतील भूगर्भात रविवारी सकाळी काही सेकंदांसाठी झालेल्या भूकंपाच्या २.९ रिश्टर स्केलच्या सौम्य धक्क्याने नवी मुंबई व पनवेल परिसर हादरुन गेला. भूगर्भातून येणारा काही सेकंदांचा आवाज आणि भूकंपाच्या सौम्य धक्क्याने पनवेल व नवी मुंबई लगतच्या खाडी लगतच्या इमारतींमधील नागरिकांमध्ये एकच घबराट पसरली. नेमकं काय झाले याबाबत सरकारी अधिकाऱ्यांना माहिती घेण्यासाठी अनेक तास लागले. अखेर दुपारी वेधशाळेच्या खात्रीलायक माहितीनंतर पनवेल महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी हा भूकंपाचा सौम्य धक्का असल्याचे अधिकृतरीत्या जाहीर केले.

रविवारी सकाळी भूगर्भातून मोठ्या आवाजासह धक्क्याने घरात काहीतरी गडगडल्या सारखे झाले. या भूकंपाचे प्रवणक्षेत्र खाडीलगतच्या परिसरात असल्याने पनवेल परिसरात खाडीलगत राहणाऱ्या रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण होते. अखेर वेधशाळेने पनवेल महापालिकेला दिलेल्या माहितीनुसार रविवारी सकाळी नऊ वाजून ५० मिनिटे ५४ सेकंदाने नवी मुंबई लगतच्या समुद्र किनारपट्टीच्या आत भूगर्भात १५ किलोमीटरच्या आत २.९ रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता. त्यामुळे मोठी हानी झाली नाही. नवी मुंबई व पनवेल हा परिसर सिडको महामंडळाने खाडीवरील कांदळवनावर मातीचा भराव करुन वसवला आहे. त्यामुळे अतिवृष्ठीत पुराच्या भितीमध्ये या परिसरात रहिवाशी राहतात.

10 fast local trains on Central Railway from Dadar station towards Kalyan as per new schedule
मध्य रेल्वेवर दहा जलद लोकल, नव्या वेळापत्रकानुसार दादर स्थानकातून कल्याणच्या दिशेने फेऱ्या
Maruti Suzuki Baleno
६.६६ लाखाच्या मारुतीच्या ‘या’ ६ एअरबॅग्स असलेल्या कारसमोर सर्व पडतात फिक्या? १ लिटर पेट्रोलमध्ये धावते ३० किमी
Illegal parking of two-wheelers in two rows on Phadke Road
डोंबिवली : वर्दळीच्या फडके रोडवर दोन रांगांमध्ये दुचाकींचे बेकायदा वाहनतळ
traffic
शहरबात: दापचरी सीमा तपासणी नाक्याला वाहतूक कोंडीचे ग्रहण

हेही वाचा : उरणमध्ये विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी, प्रदूषण आणि उकाड्यापासूनही दिलासा

अनेक वर्षानंतर भूकंपाचा हादरा बसल्याने या परिसरात भूकंपामुळे होणाऱ्या हानीबाबत दिवसभरात नागरिकांमध्ये चर्चा सुरु होती. रविवारी सकाळी भूकंपाच्या हादऱ्याने अनेकांच्या घरातील वस्तू काही सेकंदांसाठी हलल्या सारख्या झाल्या. मोठा आवाज झाल्याचे कामोठे येथील नागरिकांनी सांगितले. अनेकांनी घरातील खिडकी उघडून बाहेर काही झाले का, याची माहिती घेतली. मात्र इतर सिडको वसाहतींमध्ये अशाच प्रकारचा हादरा बसल्याचे नागरिकांनी सांगितले

Latest Comment
View All Comments
Post Comment

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Navi mumbai panvel earthquake tremors under the sea west coast in mumbai css

First published on: 26-11-2023 at 16:50 IST

आजचा ई-पेपर : नवी मुंबई

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×