नवी मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पाबरोबर शुक्रवारी नवी मुंबई परिवहन उपक्रमाचाही अर्थसंकल्प सादर करण्यात आला. पालिकेने या वर्षी ‘एनएमएमटी’ ला अनुदानापोटी २७४ कोटींचा निधीची तरतूद केली आहे. मात्र महापालिकेच्या अनुदानातुनही परिवहनाचा तोटा भरून निघत नाही. त्यामुळे मागील वर्षीपासून वाहतूक उत्पन्नाखेरीस बाह्य उत्पन्न वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

हेही वाचा- नवी मुंबई महानगरपालिकेचा शिलकी अर्थसंकल्प सादर; जुन्या प्रकल्पांनाच नवीन झळाळी

वाशी बस आगार बरोबर कोपरखैरणे, घणसोली आगाराचा वाणिज्य संकुल तसेच विद्युत बसचा जास्तीत जास्त वापर करून इंधनावरील खर्च कमी करण्याचे नियोजन आहे. परंतु हे नियोजन करून ही एनएमएमटीचा तोटा भरून निघत नाही. आरंभीच्या शिलकेसह एकूण महसूली व भांडवली रु. ४१६ कोटी ६३ लाख ९० हजार जमा आणि रु. ४१६ कोटी ५५ लाख ३० हजार खर्च व रु.८लाख ६० हजार शिल्लक रकमेच्या खर्चाचे अंदाज सादर करण्यात आले आहे.

हेही वाचा- नवी मुंबई : शैक्षणिक वर्ष अखेरपर्यंतही शिक्षक नाहीच, विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा बट्ट्याबोळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नवी मुंबई शहरातील पर्यटन स्थळांना भेट देण्यासाठी पर्यटकांसाठी डबलडेकर बसची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी पर्यावरणपूरक १० डबलडेकर विद्युत बसेस व १५ विद्युत बसेस खरेदी करणे. वाशी सेक्टर-९ बस स्थानकाचा वाणिज्य विकासाच्या कामास पूर्णत्वास नेणे. याशिवाय वाशी सेक्टर १२, कोपरखैरणे, बेलापुर, या बसस्थानकांचा सुध्दा नवी मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातुन वाणिज्य विकास करणे. महापालिकेच्या पार्किंग व मोकळया जागेवर आणि परिवहन उपक्रमाच्या बस टर्मिनसमध्ये चार्जिंग स्टेशन्स ची उभारणी हे प्रकल्प राबविण्यात येणार आहेत.