नवी मुंबई : दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नांत ट्रक चालक जखमी | Navi Mumbai Truck driver injured while trying to save two wheeler rider amy 95 | Loksatta

नवी मुंबई : दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नांत ट्रक चालक जखमी

दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रक चालकाने गाडी थेट दुभाजकावर घातल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे.

नवी मुंबई : दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नांत ट्रक चालक जखमी
( संग्रहित छायचित्र )

दुचाकी स्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात एका ट्रक चालकाने गाडी थेट दुभाजकावर घातल्याने झालेल्या अपघातात ट्रक चालक जखमी झाला आहे. ही घटना ठाणे बेलापूर मार्गावर दुपारी ३ च्या सुमारास घडली. सुदैवाने गर्दी नसल्याने व अपघात उड्डाणपुलाच्या खाली झाल्याने फारशी वाहतूक कोंडी झाली नाही.

हेही वाचा >>> गणेश विसर्जनावेळी विजेचा झटका लागलेल्यांपैकी एकाची प्रकृती चिंताजनक ; पनवेलमधील घटना

या अपघातात सुधाकर मढवी असे जखमी ट्रक चालकाचे नाव आहे. सुधाकर हे ठाणे बेलापूर मार्गावर ठाण्याच्या दिशेने जात असताना त्यांना ओव्हरटेक करून एक दुचाकीस्वार त्यांच्या गाडीच्या मार्गिकेवर अचानक आला त्यामुळे सुधाकर यांनी गाडी थांबविण्याचा प्रयत्न केला मात्र दुचाकी आणि ट्रक मधील अंतर फार कमी असल्याने त्यांनी ट्रक थेट उजवीकडे वळवला. यात दुचाकीस्वार तर वाचला मात्र ट्रक दुभाजकाला धडकल्याने
अपघात झाला. अचानक उजवीकडे वळवल्याने दुभाजकाला धडकलेले चाक ही निखळलेच या शिवाय ट्रक चालक सुधाकर हे जखमी झाले त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार करून सोडण्यात आले.

हेही वाचा >>> नवी मुंबई : घरफोडीतील सराईत आरोपीस अटक ; ६० तोळ्यांचे दागिने जप्त

गणेश विसर्जन झाल्याच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर फारशी गर्दी नव्हती त्यात उड्डाणपुलाखाली अपघात झाल्याने ठाणे बेलापूर मार्गावर अपघाताचा विपरीत परिणाम झाला नाही.अशी माहिती महापे विभागाचे वाहतूक विभाग वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजीव शेजवळ यांनी दिली. मात्र अपघात झाल्या नंतर बघ्यांची गर्दी मात्र झाली होती.

मराठीतील सर्व नवी मुंबई ( Navimumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 10-09-2022 at 18:51 IST
Next Story
विरार अलिबाग महामार्गाच्या भूसंपादनाला शेतकरी न्यायालयात आव्हान देणार ; शेतकर्‍यांना देशोधडीला लावणारा महामार्ग नको , शेतकऱ्यांचा विरोध