तळोजा पोलिसांनी एम डी ह्या अंमली पदार्थ प्रकरणी एका नायझेरियन नागरिकाला अटक करण्यात आली.त्याच्या अंगझडतीत ५७.५० ग्रॅम वजनाचा ८ लाख ६२ हजार रुपये किंमतीचा मेफेड्रॉन हा अमली पदार्थ आढळून आला.

अँथोनी नैईमेका ओकोली असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून तो नायझेरिया देशाचा नागरिक आहे.पोलिसांना  शुक्रवारी  एक नायजेरियन इसम तळोजा फेज १ येथील शंकर मंदिराच्या मागील बाजूस एमडी हा अंमलीपदार्थ विक्रीसाठी घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली होती .या माहितीच्या आधारे कारवाई करण्याकरिता वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक नरेंद्र पाटील पोलीस हवालदार सुरेश चौगुले, दिपक पाटील, पोलीस नाईक विक्रम राऊत, हरिदास करडे, विजय पाटील, पोलीस शिपाई संदेश उत्तेकर,  नितीन गायकवाड, प्रतिभा काटे हे पथक रवाना करण्यात आले.

 यात दोन वेगवेगळे पथके तयार करून शंकर मंदिराचे मागील रस्त्यावर तळोजा फेज १ येथे  शुक्रवारी अपरात्री सापळा लावण्यात आला होता. त्यादरम्यान सदर ठिकाणी एक नायजेरियन इसम संशयितरित्या घुटमळताना दिसून आला. त्यास पथकाच्या मदतीने ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे एकूण ५७.५०  ग्रॅम वजनाचा एकुण ८ लाख ६२ हजार रुपये किमतीचा  एमडी (मेफेड्रॉन) हा अंमली पदार्थ आढळून आला . अंमली पदार्थ दोन वेगवेगळ्या पारदर्शक प्लास्टिकच्या पिशवीमध्ये अनुक्रमे ४०.५० ग्रॅम वजनाचा व १७ ग्रॅम ग वजनाची भुरकट रंगाची लहान खडे मिश्रित पावडर एमडी (मेफेड्रॉन) व दिड हजाराची रोकड जप्त करण्यात आली अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सोनवणे यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सदर आरोपी भारतात बेकायदा राहत होता की त्याच्या कडे परवाना होता, तसेच त्याने सदर घटक अंमली पदार्थ आणला कोठून तो स्वतःसाठी की विक्रीसाठी आणला या बाबत तपास सुरू आहे.