नवी मुंबई – नवी मुंबई शहराची ओळख असणारी नवी मुंबईची जुहू चौपाटी  अर्थात वाशी  येथील मिनी सिशोर हे नवी मुंबईकराच्या आवडीचे व फिरण्याचे ठिकाण.  नवी मुंबई शहरात मध्यवर्ती  असलेल्या  वाशी सेक्टर १० येथील  मिनी चौपाटी येथे विविध महोत्सव होतात. याच ठिकाणी सुट्टीच्या व दिवसाबरोबरच सकाळ संध्याकाळ येथे नागरीकांची नेहमीच वर्दळ पाहायला मिळते.परंतू  शहरभर सवच्छतेची लगबग व स्वच्छता अभियान सुरु असताना या चौपाटीकडे मात्र दुर्लक्ष होत आहे.याच चौपाटीच्या परिसरात असलेल्या वॉकींग ट्रॅकलगत असलेल्या स्व. राजीव गांधी जागर्स पार्कच्या लगतच पालिकेने एक निर्माल्यकलश ठेवलेला आहे. शहरभर स्वच्छता पाहायला मिळत असताना येथील निर्माल्य कलश मात्र धुळीने माखलेला आहे. त्यामुळे हीच का ती स्वच्छता असे चित्र येथे पाहायला मिळत आहे. त्यामुळे नागरीक नाराजी व्यक्त करत आहेत.

हेही वाचा >>> नवी मुंबई : घाऊक बाजारात कांद्याच्या दरात घसरण सुरू, नवीन कांद्याची आवक वाढली

Baramati farmer commits suicide by drinking poisonous medicine Allegation of neglect of government agencies
बारामतीत शेतकऱ्याची विषारी औषध पिऊन आत्महत्या, शासकीय यंत्रणांच्या दुर्लक्षामुळे आत्महत्या केल्याचा आरोप
snatched compensation of 11 crores of land in Nilje village near Dombivli on name of dead person
डोंबिवलीजवळील निळजे गावात मयत व्यक्तीच्या नावाने जमिनीचा ११ कोटीचा मोबदला लाटला
Video 5 Rupees Lemon Jugad How To Clean Gas Burners at Home
अर्ध्या लिंबाच्या रसात ‘ही’ गोष्ट मिसळून अर्धवट पेटणाऱ्या गॅस बर्नरवर करा उपाय; पैसे, वेळ वाचवणारा जुगाड, Video
ow pressure water supply
दोन दिवस कमी दाबाने पाणी, मोरबे मुख्य जलवाहिनीवर आज १० तास देखभाल दुरुस्ती; नवी मुंबईसह कामोठे, खारघरलाही फटका

वाशी हे नवी मुंबईतल मध्यवर्थी ठिकाण आहे. याच परिसरात असलेली  जुहू चौपाटी मिनी सिशोर म्हणून प्रसिध्द आहे. याच परिसरात अनेक उद्यानेही आहे. याच मिनी सिशोर परिसरात असलेल्या ट्रॅकवर चालण्यासाठी पहाटेपासून ते रात्रीपर्यंत मोठी गर्दी असते. तसेच याच परिसरात असलेल्या विविध उद्यानांमध्ये मुलांना खेळ्यासाठी सोयीसुविधा असल्याने हा परिसर कायम वर्दळीचा परिसर म्हणून ओळखला जाते. परंतू या परिसराची स्वच्छता विभागाकडून या परिसरात सकाळी स्वच्छता केली जाते. त्यानंतर स्वच्छतेकडे पालिकेचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. दुसरीकडे याच परिसरात दिवसभर नागरीकांची कमी अधिक प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. सकाळी ५.३० ते १० वाजेपर्यंत व संध्याकाळी ५.३० ते ८.३० वाजेपर्यंत चालण्यासाठी येथे परवानगी आहे. परंतू रस्त्याकडील परिसर हा दिवसभर वर्दळीचा असतो. त्यामुळे मुले  तसेच महाविद्यालयीने विद्यार्थी यांची ही गर्दी असते. त्यामुळे यावेळात या ठिकाणी इतरत्र कचरा पडलेला असतो. खाऊचे प्लास्टिकचे रॅपरही पाहायला मिळतात. त्यामुळे  सातत्याने वर्दळीच्या असलेल्या या परिसरात  किमान दोन वेळा स्वच्छता होणे आवश्यक आहे. नवी मुंबई महापालिकेच्यावतीने शहरात हॉटेल काही गर्दीच्या भागात दोन वेळा साफसफाई केली जाते. तसेच कचरा वाहतूक गाड्याही दोन वेळा कचरा उचलतात. त्यामुळे नवी मुंबई शहरातील सातत्याने वर्दळीचे असलेल्या या मिनी सिशोर परिसरात दोन वेळा साफसफाई होण्याची आवश्यकता असल्याची मागणी होत आहे.तसेच नागरीकांच्या सातत्याने निदर्शनास येणाऱ्या धुळ माखलेल्या कलशाची स्वच्छता होणेही आवश्यक आहे. नवी मुंबई शहरात तलावांच्या बाहेरही असे निर्माल्यकलश आहेत. त्यामुळे शहर स्वच्छतेबाबत पालिकेने  अनेक छोट्या परतू स्वच्छतोला बाधा ठरणाऱ्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

हेही वाचा >>> नवी मुंबई : तृतीय पंथियांनी आयोजित केलेल्या हळदी कुंकू समारंभाला भरघोस प्रतिसाद

चौकट- नवी मुंबई वाशी मिनी सिशोर परिसरातील स्वच्छतेबाबत काळजी घेण्यात येईल. या ठिकाणी नागरीकांची नेहमी वर्दळ असते. त्यामुळे दोन वेळा स्वच्छता करण्याबाबत निर्णय घेण्यात येईल. तसेच शहरातील निर्माल्य कलश व त्यांच्या स्वच्छतेकडेही लक्ष देण्याबाबत योग्य त्या उपाययोजना करण्यात येतील. राजेंद्र सोनावणे, मुख्य स्वच्छता अधिकारी ,नवी मुंबई महापालिका