पनवेल ः नवी मुंबई पोलीस दलाचे २० पोलीस ठाण्यात सर्वत्र लोकसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ऑलआऊट ऑपरेशन सुरु आहे. यामध्ये संशयीतांची धरपकड करुन त्यांची अंगझडती व त्यांच्या ताब्यातील वस्तू तपासले जातात. याच मोहिमेअंतर्गत पनवेल शहर पोलिसांनी गुरुवारी मध्यरात्री अडीच वाजता एका संशयीत तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक किलो ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमलीपदार्थ जप्त केला आहे.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितिन ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा लावून ही कारवाई करण्यात आली. पोलीस निरीक्षक अंजुमन बागवान प्रविण भगत, पोलीस उपनिरीक्षक अभयसिंह शिंदे, विनोद लबडे, तसेच साध्या वेशातील पोलिसांचे पथक रेल्वे स्थानकाबाहेर अंमलीपदार्थ विक्रीसाठी एक संशयीत येणार असल्याने गुरुवारी रात्रीपासून संशयीताच्या प्रतिक्षेत होते. पहाटे पावणेचार वाजता रेल्वेस्थानकाच्या शेजारी राहणारा ३५ वर्षीय राजू दास हा संशयीत तेथे आला. पोलीस पथकाने त्या संशयीताची चौकशी केल्यावर राजू याच्या जवळील वस्तूंची तपासणी केल्यावर त्याच्याकडे एका पिशवीत गांजा सापडला.

हेही वाचा – बच्‍चू कडू यांच्या खेळीने महायुतीसाठी डोकेदुखी वाढणार ?

हेही वाचा – सांगलीच्या आखाड्यात पैलवान उतरल्याने भाजप आणि काँग्रेसची समीकरणे बदलली

हेही वाचा – लिंगायत मतपेढीचे गणित मांडत लातूरमध्ये काँग्रेसची डॉ. शिवाजी काळगे यांना उमेदवारी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी याप्रकरणी दास याच्यावर एन.डी.पी.एस. कायद्याअंतर्गत ८ (क), २० (ब) या अन्वये गुन्हा दाखल केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक ठाकरे यांनी दिली.