वाशीतील एपीएमसी घाऊक बाजारात गणेशोत्सवानतंर कांद्याचे दर हळूहळू वाधारत आहेत. कांद्याच्या दरात सातत्याने वाढ होत असून दोन आठवड्यापूर्वी प्रातिकिलो १५-२०रुपयांनी उपलब्ध असलेल्या कांद्याची या आठवड्यात सातत्याने दरवाढ होत असून शनिवारी घाऊक बाजारात २५-३१रुपयांनी विक्री झाला आहे तर किरकोळ बाजारात ४०-४५रुपयांनी उपलब्ध आहे.

हेही वाचा >>>नवी मुंबई : मोठ्या आवाजात बोलतो म्हणून हत्या करणाऱ्यास अटक

no alt text set
सीवूड्समध्ये पाच फ्लेमिंगोचा मृत्यू तर, सात जखमी
election commission seized 35 lakhs cash in car in two different incident
३५ लाखांची रोकड मोटारींमध्ये वाहतूकीदरम्यान सापडली; पनवेलच्या निवडणूक आयोगाच्या भरारी पथकाची कारवाई
uncle rapes 18 Yr old niece in panvel
पनवेलमध्ये नात्याला काळीमा फासणारी घटना! काकाचा पुतणीवर अत्याचार, आरोपीला अटक
hot temperature, reptiles, snakes affected, cold temperature, enters in citizen colony, marathi news, snake news, snake in uran, uran news, uran snake news,
उरण : उन्हाच्या तडाख्याचा सरपटणाऱ्या प्राण्यांना फटका, गारव्यासाठी नागरी वस्तीत शिरकाव

अवकाळी पडलेल्या पावसाने कांद्याच्या किमतीत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. दिवाळीनंतर बाजारामध्ये नवीन कांदा दाखविण्यास सुरुवात होते मात्र पावसामुळे नवीन लाल कांद्याच्या उत्पादन लांबणीवर गेले आहे. नवीन कांद्याच्या हंगामाला उशिरा सुरुवात होणार असून जुन्या कांदा देखील खराब निघत आहे. बाजारात शनिवारी ८० गाड्या दाखल झाल्या आहेत. बाजारात उच्चतम दर्जाचा कांदा कमी येत असून खराब कांदा अधिक दाखल होत आहे. त्यामुळे चांगल्या कांद्याला मागणी असून मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत असल्याने कांद्याच्या दारात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. मागील आठवड्यात २० ते २५ रुपयांवर कांदा स्थिर होता. परंतु या आठवड्यात कांद्याचे दर वधारण्यास सुरुवात झाली आहे. दोन दिवसांपूर्वी कांद्याच्या दरवाढीला सुरुवात झाली २५ ते २७ रुपयांवर गेला तर शनिवारी २५-३१ रुपये किलो दराने विक्री होत आहे.