नवी मुंबई: शहरात विविध ठिकाणी खुल्या व्यायाम शाळा बांधण्यात आल्या आहेत. तुर्भे एम.आय.डी.सी. मध्ये याआधी खुली व्यायामशाळा, उद्यान यांची याआधी वानवा होती. नागरीकांची गरज लक्षात घेता शिवसेना उपशहरप्रमुख महेश कोटीवाले यांच्यासह अनेकांनी याबाबत नवी मुंबई महानगरपालिकेकडे वारंवार पाठपुरावा केला होता. तेव्हा तुर्भे विभागात इंदिरानगर शांताबाई सुतार उद्यान या ठिकाणी दिनांक ७ सप्टेंबर २०२२ रोजी खुल्या व्यायाम शाळेच्या कामाचा शुभारंभ होत १२ नोव्हेंबर २०२२ रोजी खुल्या व्यायाम शाळाचे उद्घाटनही करण्यात आले.

आता या भूखंडाची पालिकेला न कळवता एमआयडीसीने विक्री केल्याचं समोर आलं आहे. हा भूखंड एका व्यक्तिला विकला असल्याची माहिती आहे. या विक्री विरोधात स्थानिक शिवसेना नेत्यांनी वारंवार पालिकेकडे पाठपुरावाही केला होता. असं असतांना बुधवारी रात्री या खुल्या व्यायाम शाळेच्या साहित्याची तोडफोड करत ते जेसीबीच्या मदतीने उखडून काढल्याचं समोर आलं आहे. खुल्या व्यायाम शाळेसाठी महापालिकेने खर्च केला होता. तेव्हा या व्यायाम शाळेची तोडफोड करणाऱ्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्याची मागणी महापालिकेकडे करण्यात आली आहे.

आणखी वाचा-भावाने मानेत चाकू भोकसला, त्याच अवस्थेत रुग्णालयात गेला अन्…; नवी मुंबईतील थरकाप उडवणारी घटना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एमआयडीसीने १९९७ मध्ये हा भूखंड पालिकेला दिलेला असताना पालिकेने त्या ठिकाणी लाखो रुपयाची काम करून उद्यान व ओपन जिम तयार करण्यात आली होती. परंतु एमआयडीसीने परस्पर विक्री केल्यामुळे या भूखंडाचा वाद निर्माण झाला असून या विरोधात नागरिकांनी वारंवार पालिकेकडे तक्रारी केल्या होत्या. आता याबाबत न्यायालयात दाद मागण्यात येईल. -महेश कोटीवाले, उपशहर प्रमुख, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट