नाट्य-सिनेमागृहातील अडचण दूर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उरण : शहरात एकही सांस्कृतिक केंद्र नसल्याने उरण नगरपरिषदेने शहरात नवीन नाट्यगृह, सिनेमागृह तसेच व्यापारी संकुल उभारण्याचे ठरविले होते. मात्र या कामाला किनारी नियमन क्षेत्राचा अडथळा निर्माण झाल्याने ते रखडले होते. आता या कामाला परवानगी मिळाली असून काम सुरू झाले आहे. त्यामुळे पुढील दोन वर्षांत ही सेवा उरणकरांना शहरातच मिळणार आहे.

मुंबई व नवी मुंबईसारख्या अत्याधुनिक शहराच्या कवेत असलेल्या उरण शहरातही नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मात्र या ठिकाणी सांस्कृतिक मनोरंजन, कार्यकमासाठी एकही वास्तू अस्तित्वात नाही. त्यामुळे नगरपरिषदेने त्यांच्या टाऊन हॉलची दुरवस्था झाल्याने ती तोडून त्या ठिकाणी नवीन नाट्यगृह, सिनेमागृह तसेच व्यापारी संकुल उभारण्याचे ठरविले होते. यासाठी शासनाकडून १२ कोटी रुपयांचा निधीही उपलब्ध झाला आहे. मात्र किनारी नियमन क्षेत्राचा अडथळा आल्याने हा प्रकल्प रखडला होता.

उरण नगरपरिषदेच्या वतीने ऑगस्ट २०२१ पासून काम सुरू करण्यात आले असून हे काम येत्या २४ महिन्यांच्या कालावधीत म्हणजे ऑगस्ट २०२३ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश कंत्राटदाराला देण्यात आले असल्याची माहिती उरण नगर परिषदेचे मुख्याधिकारी संतोष माळी यांनी दिली.

नवे संकुल असे

 एकूण ४४ हजार चौरस मीटरच्या आकाराचे हे संकुल असून यात तळमजला अधिक दोन मजले अशी रचना आहे. तळमजल्यावर व्यापार संकुल, वाहनतळ पहिल्या मजल्यावर ६०० आसनाची सोय असलेले ७५ बाय ६० फुटांचे नाट्यगृह, कम्युनिटी सेंटर, वाचनालय, दुसऱ्या मजल्यावर २०० आसनाचे दोन स्वतंत्र मल्टीफ्लेक्स व मंगल कार्यालय करण्यात येणार आहे.

Navimumbai News (नवी मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Overcome the problem of theatre cinema akp
First published on: 15-10-2021 at 00:39 IST